Join us

चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतल्या तरुणीइतका तुकतुकीत; आहारात ‘हे’' ७ पदार्थ नक्की खा, चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 17:46 IST

1 / 9
वाढत्या वयात आपणही तरुण आणि तजेलदार दिसावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. हे सर्व अवलंबून असते ते आहार आणि आपल्या जीवनशैलीवर. (Reduce Wrinkles Naturally with Diet)चिंता, ताण किंवा थकवा याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात. (Foods That Make You Look Younger)
2 / 9
आपल्यालाही चाळीशीत विशीसारखे तरुण दिसायचे असेल तर आहारात बदल करायला हवा. तसेच चिंता, ताणतणावही कमी करायला हवा. ज्यामुळे आपले आरोग्य सुधारेल. वाढत्या वयात आहार कसा असायला हवा पाहूया. (Anti-Aging Foods for Healthy Skin)
3 / 9
रताळ खाल्ल्याने आपली त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. त्यासाठी नियमितपणे आहारात रताळे खा. यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जीवनसत्त्व, खनिजे आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.
4 / 9
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीज अशा विविध प्रकारच्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी आढळते. यामुळे सूर्यकिरणामुळे किंवा प्रदूषण आणि घाणीमुळे त्वचेचं होणारं नुकसान कमी होण्यास मदत होते.
5 / 9
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं आढळतात. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम , पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन सी, के, बी- १ आणि बी-२ आढळतात. यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.
6 / 9
सकाळी अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावा. यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.
7 / 9
तांदळाचे पीठ आणि गुलाब पाण्याचा पेस पॅक लावू शकतो. यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येत नाहीत.
8 / 9
डाळींबामध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करुन शरीराच्या डीएनएमध्ये ऑक्सिडेशन कमी करते. हे खाल्ल्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
9 / 9
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सि़डंट्स मोठ्या प्रमाणात आढळते. जे वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात. तसेच आपली पाचन प्रणालीही निरोगी ठेवते. त्यासाठी किमान दिवसातून दोन वेळा ग्रीन टी प्यायला हवी.
टॅग्स : ब्यूटी टिप्सअन्न