फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

Updated:April 6, 2026 17:14 IST2026-04-06T17:04:30+5:302026-04-06T17:14:57+5:30

दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने हेल्मेट वापरल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

जर तुम्ही दररोज बाईक चालवत असाल आणि हेल्मेट वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकांची अशी तक्रार असते की हेल्मेट घातल्यामुळे त्यांचे केस गळत आहेत.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, पण खरंच यामुळे केस गळतात का? यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने हेल्मेट वापरल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

हेल्मेट हे केस गळतीचं थेट कारण बनत नाही. मात्र, बराच वेळ हेल्मेट घातल्यामुळे स्काल्पला जास्त घाम येतो. जेव्हा हा घाम बराच काळ केसांच्या मुळांशी साचून राहतो, तेव्हा मुळं कमकुवत होऊ शकतात.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

वारंवार हेल्मेट घालताना आणि ते डोक्यातून काढताना केसांवर ताण पडतो किंवा केस ओढले जातात, ज्यामुळे केस तुटण्याची समस्या निर्माण होते.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

जर हेल्मेट खूप घट्ट असेल किंवा त्याची फिटिंग योग्य नसेल, त्यामुळे केस ओढले जातात. हळूहळू केस कमकुवत होऊन गळू लागतात. तसेच अस्वच्छ हेल्मेट वापरल्यामुळे स्काल्पवर बॅक्टेरिया आणि डँड्रफ होण्याची शक्यता वाढते.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

केस गळती रोखण्यासाठी तुमचे केस, स्काल्प स्वच्छ ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. घाम, घाण साचू नये यासाठी नियमितपणे केस धुवावेत. याशिवाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावल्याने पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

ओल्या केसांवर हेल्मेट घालू नका कारण ओले केस अधिक नाजूक असतात, त्यामुळे ते सहज तुटू शकतात. हेल्मेटच्या आत कॉटन टोपी किंवा रुमाल वापरणं उत्तम आहे. हे घाम शोषून घेतं आणि केसांना ओढले जाण्यापासून वाचवतं.

फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य

नेहमी योग्य मापाचे हेल्मेट वापरा जे डोक्यावर सहज फिट होईल. हेल्मेटला वेळोवेळी आतून साफ करत राहा, जेणेकरून त्यात साचलेली घाण आणि बॅक्टेरिया केसांचे नुकसान करणार नाहीत. हेल्मेट काढताना नेहमी सावकाश काढा, जेणेकरून केस ओढले जाणार नाहीत.