रेशमी केस आणि 'ग्लास स्किन'साठी १० कोरियन ब्यूटी हॅक्स; सुंदर दिसण्यासाठी यापेक्षा सोपे उपाय शोधूनही सापडणार नाहीत
Updated:April 3, 2026 11:51 IST2026-04-02T20:00:00+5:302026-04-03T11:51:24+5:30
Secret to flawless Korean skin in Marathi: Natural remedies for glass skin and shiny hair: आपल्याला रुपयाही न खर्च करता सुंदर दिसायचे असेल तर कोरियन मुलींचे १० सिक्रेट्स हॅक्स फॉलो करा.

कोरियन मुलींची त्वचा काचेसारखी पारदर्शक, डागविरहित आणि चमकणारी असते, ज्याला ग्लास स्किन असंही म्हटलं जातं. फक्त त्वचाच नाही तर त्यांचे केसही अतिशय रेशमी, सरळ आणि दाट असतात. अनेकांना असं वाटतं की हे सौंदर्य महागडे ट्रिटमेंट्समुळे मिळते. पण त्यांच्या सौंदर्याचे खरे रहस्य हे त्यांच्या नैसर्गिक घरगुती उपायांमध्ये आहे. (Secret to flawless Korean skin in Marathi)
कोरियन ब्यूटी हॅक्स हे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यावर आणि नैसर्गिक घटकांचा वापर करण्यावर भर देतात. जर आपल्यालाही रुपयांही न खर्च करता सुंदर दिसण्यासाठी कोरियन मुलींचे १० सिक्रेट्स हॅक्स पाहूया.(Natural remedies for glass skin and shiny hair)
कोरियन स्किन केअरमध्ये तांदळाचे पाणी सगळ्यात महत्त्वाचे आहे. तांदूळ भिजवलेले पाणी फेकून न देता ते चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरा. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि लवचिकता वाढते. केसांसाठी हे पाणी उत्तम कंडिशनर आहे.
कोरियन मुली अंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर किंवा टोनर लावतात. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.
दिवसभरात फक्त एकदा चेहरा धुणे पुरेसे नाही. आधी ऑईल-बेस्ड क्लींजरने मेकअप आणि घाण काढा. नंतर वॉटर बेस्ड फोमने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि मुरुमे येत नाहीत.
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आपल्याला आहारात डाळी, पनीर, अंडी किंवा टोफू यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.
दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी भिजवलेल्या सुकामेव्याने करा. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहतात. ज्यामुळे त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते.
अतिप्रमाणात गोडाचे- मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ त्वचेवर सूज आणि मुरुमांचे कारण बनतात.
आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दही आणि आंबवलेले पदार्थ खा. आपले पोट स्वच्छ असेल तर चेहरा आपोआप उजळेल.
आपले केस आणि त्वचा उन्हापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, बाहेर जाताना सनस्क्रीन आणि स्कार्फ वापरायला कधीही विसरू नका.
दररोज ७-८ तास झोपणे खूप महत्त्वाचे आहे. 'ब्युटी स्लीप' गरजेची आहे. केवळ रात्रीची गाढ झोपच आपल्या त्वचेची दुरुस्ती करते.