Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केसांच्या सगळ्या तक्रारी ८ दिवसांत कमी होतील! 'हा' उपाय करा- केस होतील जाड, लांब, हेल्दी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 17:33 IST

1 / 10
हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. कमी वयात केस पांढरे झाले की ते लपविण्यासाठी मग कित्येक गोष्टी कराव्या लागतात.
2 / 10
याशिवाय केस गळणे, केसांना अजिबातच वाढ नसणे, गळून गळून केस पातळ होणे, केसांना फाटे फुटणे असे त्रासही अनेकांना होतच आहेत.
3 / 10
केसामध्ये काेंडा होण्याची समस्याही खूप जास्त वाढली आहे. डोक्यातला कोंडा वाढला की आपोआपच केस गळण्याचे प्रमाणही वाढते.
4 / 10
म्हणूनच तुमच्या केसांच्या अशा कोणत्याही तक्रारी असतील तर त्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची सोपी, छान माहिती डॉक्टरांनी dr_ashwini_j या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले उपाय नियमितपणे करून पाहा. अगदी काही दिवसांतच केसांचे सगळे त्रास कमी झालेले जाणवतील.
5 / 10
शरीरात ओमेगा ३ ची कमतरता असेल तर केस तुटतात. जर तुमचेही केस तुटत असतील तर तुम्ही रोज १ चमचा जवस खायला हवे.
6 / 10
केस कमी वयात पांढरे होत असतील तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे. त्यासाठी इडली, डोसा, ढोकळा असे आंबवलेले पदार्थ खायला हवे.
7 / 10
केस खूप पातळ असण्याचं कारण म्हणजे शरीरात लोह कमी असणं. ते वाढविण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर नियमितपणे खा. शरीरातलं लोह वाढून केसही दाट होतील.
8 / 10
शरीरात झिंकची कमतरता असेल तर नेहमीच डोक्यात कोंडा होतो. ही कमतरता भरून काढण्यासाठी भोपळ्याच्या बिया रोज खा. त्यातून भरपूर झिंक मिळते.
9 / 10
ज्या पुरुषांना टक्कल पडायला सुरुवात झाली असेल त्यांनी ब्राह्मीची गोळी किंवा ब्राह्मीचा काढा रोज नियमितपणे घ्यायला हवा.
10 / 10
जर शरीरातील काेर्टीसॉल हार्मोन खूप जास्त वाढला तर त्याचा परिणाम केस गळण्यावर दिसून येतो. केस खूप जास्त गळायला लागतात. असं होऊ नये म्हणून रोज रात्री झोपण्यापुर्वी अश्वगंधा काढा घ्यावा. हार्मोन संतुलित राहून केस गळण्याचं प्रमाण कमी होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीअन्न