1 / 6रोज नियमितपणे ब्रश करुन देखील अनेकांचे दात कायम पिवळे असतात. डॉक्टरांचे मत दिवसांतून दोन वेळा ब्रश करायला हवा. पण तरीही काही जणांच्या दातांचा पिवळेपणा जात नाही. जोरजोरात दात घासल्याने ते अधिक सेंसिटीव्ह होतात. (dental care at home)2 / 6अनेकजण दातांचा पिवळा थर काढण्यासाठी सतत ब्रश करतात यामुळे हिरड्यांना त्रास होतो, त्यातून रक्त निघू लागते. पण एक सोपा उपाय केला तर दातांचा पिवळेपणा कमी होण्यास नक्की मदत होईल. (natural oral hygiene)3 / 6अमेरिकेचे डॉक्टर एरिक बर्ग सांगतात की आपण बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइडची पेस्ट करुन दातांवर चोळायला हवी. ही पेस्ट ब्रश करतो तशी हलक्या हाताने घासा. १ मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने तोंड चांगले धुवा. यामुळे दातांचा वरचा थर चमकण्यास मदत होईल. 4 / 6हा उपाय आपल्याला आठवड्यातून २ ते ३ वेळा करायला हवा. या पेस्टने दररोज दात घासू नका, अन्यथा दातांना नुकसान होऊ शकते. तसेच यानंतर तोंड स्वच्छ धुवा. 5 / 6दातांवरील प्लेक काढण्यासाठी फळे आणि भाज्या खा, यामुळे नैसर्गिक स्वच्छता टिकून राहते. 6 / 6जर आपल्याला टुथपेस्ट वापरायची नसेल तर आपण मध वापरुन दात स्वच्छ करु शकतो. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र होण्यास मदत होईल.