Join us

चमकदार दात हवेत तर ‘या’ ४ पदार्थांनी घासा, टूथपेस्टपेक्षाही भन्नाट उपाय-दातांची घ्या काळजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 10:05 IST

1 / 6
'हसतील त्याचे दात दिसतील'...असं आपण म्हणतो, परंतु हसल्यावर (how to whiten teeth naturally) आपले दात स्वच्छ, सुंदर आणि पांढरेशुभ्र दिसावेत असे प्रत्येकाला वाटते. काहीवेळा दातांवरील पिवळा थर ( natural teeth whitening at home) इतका वाढतो की दात दिसताना खूपच वाईट दिसतात. अशा परिस्थितीत, बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्ट अनेकदा केवळ तात्पुरता परिणाम देतात. पण जर दात नैसर्गिकरित्या पांढरेशुभ्र आणि चमकदार करायचे असतील, तर घरच्याघरीच काही सोपे आणि असरदार उपाय करुन पाहा.
2 / 6
टूथपेस्टऐवजी काही घरगुती पदार्थ वापरल्यास दातांवरील पिवळसर (home remedies for yellow teeth) थर निघून जाईल. दात पांढरेशुभ्र होऊन एक वेगळीच चमक येईल. असे कोणते घरगुती उपाय (remove yellow stains from teeth) आहेत, जे तुमच्या स्मितहास्याला अधिक खुलवतील!
3 / 6
बेकिंग सोडा हे नैसर्गिक एक्सफोलिएटर असून दातांवरील पिवळसर थर कमी करण्यात मदत करतो. आठवड्यातून २ ते ३ वेळा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून दात घासल्यास नैसर्गिक चमक पुन्हा मिळू शकते. मात्र, याचा जास्त वापर टाळावा.
4 / 6
केळीची सालेही दात पांढरेशुभ्र करण्यासाठी उपयोगी ठरतात. सालीच्या आतील भागामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज यांसारखे खनिज घटक असतात, जे दातांवरील डाग हलके करतात. रोज १ ते २ मिनिटं सालीचा आतील भाग दातांवर हळूवार चोळा आणि काही वेळाने ब्रश करा.
5 / 6
संत्र्याच्या सालीमध्ये असलेले सिट्रिक अ‍ॅसिड दातांवरील पिवळसर थर कमी करण्यात मदत करते. सालीचा आतील भाग दातांवर हलक्या हाताने १ ते २ मिनिटं चोळावा आणि नंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास दात नैसर्गिकरित्या पांढरेशुभ्र होतात. याचबरोबर, आपण संत्र्याची सालं सुकवून त्याची पावडर करून देखील दातांसाठी रोज टूथपावडर सारखी वापरु शकतो.
6 / 6
हळदेमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे दात स्वच्छ ठेवण्यास आणि पिवळसरपणा कमी करण्यास मदत करतात. थोडीशी हळद पावडर थेट ब्रशवर घेऊन किंवा नारळाच्या तेलासोबत मिसळून दात घासा. हा उपाय नियमित केल्याने दात पांढरेशुभ्र आणि निरोगी राहतात.
टॅग्स : ब्यूटी टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय