गव्हाच्या पिठात कालवून लावा ‘हा’ पदार्थ, फेसवॉश-क्रिम विसराल इतकी त्वचा होइल मऊ-पिंपल्स गायब
Updated:September 9, 2025 18:02 IST2025-09-09T17:59:36+5:302025-09-09T18:02:27+5:30
wheat flour face pack: wheat flour for skin whitening: wheat flour for pimples: पिंपल्स आणि टॅनिंग कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा स्क्रब कसा वापरा.

सध्या बाजारात अनेक फेशवॉश, क्रीम्स, स्क्रब उपलब्ध आहेत. पण केमिकल्समुळे त्वचेला नुकसान होते. ज्यामुळे त्वचा उजळण्याऐवजी अधिक खराब होते. (wheat flour face pack)
आपणही सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळी आपण घरगुती उपाय करुन पाहातो. पण मुलतानी माती, बेसनाच्या पिठाऐवजी गव्हाच्या पिठाचा स्क्रबर त्वचेवर लावल्यास फायदा होईल. यामुळे पिंपल्स आणि टॅनिंगही कमी होऊ शकते. यासाठी काय करावं पाहूया. (wheat flour for skin whitening)
आपल्याला १ चमचा गव्हाच्या पिठात साखर, बेसन आणि २ चमचे दही घालून त्याचे स्क्रब तयार करा. हे स्क्रब चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे ठेवा. त्यानंतर हलके चोळून चेहरा स्क्रब करा आणि नंतर धुवून टाका. ही पेस्ट आपले टॅनिंग कमी करेल.
आपण २ चमचे मैदा, दूध आणि गव्हाचे पीठ घालून पेस्ट करुन १५ मिनिटे त्वचेवर लावा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा उजळण्यास मदत होईल.
मैदा, गव्हाचे पीठ आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होतात, चेहरा उजळतो.
गव्हाच्या पिठात कोरफड आणि कॉफी पावडर मिसळल्यास तेलकटपणा कमी करून पिंपल्स कमी करतो.
हे उपाय नियमितपणे केल्याने त्वचेचा रखरखीतपणा कमी होतो. तसेच उन्हामुळे झालेला काळसरपणा हळूहळू कमी होतो.