Join us

केस नॅचरली काळे करण्याचा सगळ्यात सोपा उपाय! मेहेंदी, डाय लावण्याची कटकटच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 17:15 IST

1 / 7
हल्ली कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले आहेत. कॉलेजमधल्या कित्येक विद्यार्थ्यांचेही केस हल्ली पांढरे झालेले असतात आणि ते लपविण्यासाठी त्यांना डाय, मेहेंदी, हेअरकलर अशा गोष्टींचा वापर करावा लागतो.(natural hair colour for getting black hair)
2 / 7
एवढ्या कमी वयापासूनच केसांवर केमिकलयुक्त डाय किंवा हेअरकलर लावणे अनेकांना पटत नाही. कारण त्याचे खूप साईडइफेक्ट त्वचेवर, केसांवर, आरोग्यावर होत असतात असं आपण नेहमीच ऐकतो.
3 / 7
म्हणूनच आता मेहेंदी, डाय असं काहीही न लावता केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे करायचे असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय आयुर्वेद अभ्यासकांनी vishwamangalayurved या इन्स्टाग्राम पेजवर सुचवला आहे.
4 / 7
हा उपाय करण्यासाठी त्रिफळा चूर्ण एखाद्या लोखंडाच्या कढईमध्ये घ्या.
5 / 7
त्या चुर्णामध्ये लिंबाचा रस घाला. त्रिफळा चूर्ण व्यवस्थित भिजून त्याची चांगली पेस्ट तयार होईल एवढा लिंबाचा रस त्यात घालावा.
6 / 7
आता ही कढई रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या त्रिफळा चूर्णला काळसर रंग आलेला असेल. आता ही पेस्ट हातामध्ये ग्लोव्ह्ज घालून किंवा ब्रश वापरून तुमच्या केसांना लावा.
7 / 7
ही पेस्ट तुमच्या केसांवर साधारण १ तास राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांना छान काळसर रंग आलेला असेल आणि हा रंग तुमच्या केसांवर महिनाभर तरी टिकून राहील असं डॉक्टर सांगत आहेत.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी