चेहरा खूपच काळवंडला? १ चमचा दुधाची साय चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीनं लावा; चेहऱ्यावर येईल तेज
Updated:February 24, 2026 16:40 IST2026-02-23T16:54:41+5:302026-02-24T16:40:27+5:30
How To Use Malai On Face : नेहमी ताजी आणि स्वच्छ साय वापरा. शिळी किंवा खराब झालेली साय लावल्यास त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं.

चेहऱ्याला दूध किंवा दुधावरची साय लावणं हा अतिशय जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. साय त्वचेसाठी नैसर्गिक मॉईश्चरायजर म्हणून काम करते तिचे काही मुख्य फायदे पाहूया. (How To Use Malai On Face)
दुधाच्या सायीमध्ये फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. जे कोरड्या आणि निर्जीव त्वचेला ओलावा देतात. हिवाळ्यात किंवा ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे.
नियमित दुधाची साय लावल्यामुळे त्वचा मऊ, मुलायम आणि रेशमी होते. दुधाची साय त्वचेतील घाण आणि मृत पेशी हळूवारपणे काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो परत येतो.
दुधाच्या सायीमध्ये लॅक्टीक एसिड असते जे त्वचेचा रंग उजळण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.
दुधाची साय त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते. ज्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
यात असलेल्या व्हिटामीन्समुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते आणि त्वचा ताजी-तवानी दिसते.
थोडी ताजी साय घेऊन चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटं हलक्या हातानं मसाज करा आणि त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.
तुम्ही दुधाच्या सायीत थोडं बेसन किंवा हळद मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला लावू शकता. जर तुमची त्वचा आधीच खूपच तेलकट असेल आणि पिंपल्सची समस्या असेल तर साय वापरणं टाळावं. कारण यामुळे त्वचेची छिद्र बंद होऊन पिंपल्स वाढू शकतात.
नेहमी ताजी आणि स्वच्छ साय वापरा. शिळी किंवा खराब झालेली साय लावल्यास त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं.
रसायनं नसलेल्या या नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला कोणताही अपाय न होता नैसर्गिक ग्लो मिळतो.