1 / 6आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. त्यातील अनेकजण काळा चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे दिवसभर आपण ऊर्जात्मक राहतो. तसेच केसांच्या वाढीसाठी देखील ब्लॅक टी फायदेशीर आहे. (Black tea for hair)2 / 6ऋतू बदलल्याने केस गळतीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळ काळा चहामध्ये काही घटक मिसळून लावल्यास केसांच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल. (Hair darkening tips)3 / 6केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी, ब्लॅक टी बनवताना कडुलिंबाची पाने घाला. आता पाणी काही वेळ उकळल्यानंतर, चहा थंड होऊ द्या. केस धुतल्यानंतर, तो मुळांपासून टोकापर्यंत लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो.4 / 6कॉफी नैसर्गिक ओलावा केसांना वाढण्यास मदत करते. ब्लॅक टी बनवल्यानंतर त्यात एक चमचा कॉफी पावडर घाला आणि मिक्स करा. हे शाम्पूमध्ये मिसळा आणि केस धुवा. यामुळे केसांच्या कोरडेपणाची समस्या दूर होते.5 / 6केसांचे पोषण वाढवून केस गळती रोखण्यासाठी, काळ्या चहामध्ये बदाम तेलाचे काही थेंब मिसळा आणि केस धुण्यापूर्वी ते स्प्रे करा. यामुळे टाळूला ओलावा मिळतो आणि केस तुटण्याची समस्या दूर होते.6 / 6केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी, मेंहेदीमध्ये काळी चहा मिसळा आणि केसांना लावा. हे केसांना वेगवेगळ्या भागात विभागून लावा. यामुळे केसांची ताकद वाढते आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.