चेहऱ्यावर पिंपल्स- केसात कोंडा झाला? तुरटीत मिसळा ६ गोष्टी- रात्री 'या' पद्धतीने लावा, त्वचेवर येईल ग्लो-कोंडाही कमी
Updated:December 31, 2025 20:00 IST2025-12-31T20:00:00+5:302025-12-31T20:00:02+5:30
Natural remedies for pimples: Pimples home remedy: Dandruff home treatment: अचानक येणारे पिंपल्स, काळपटपणा, डल स्किन आणि हरवलेला चेहरा ही अनेकांची सामान्य तक्रार आहे.

ऋतू बदलला की त्याचा आपल्या चेहऱ्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत बदलेली खाण्यापिण्याची सवय, प्रदूषण आणि ताणतणाव याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. अचानक येणारे पिंपल्स, काळपटपणा, डल स्किन आणि हरवलेला चेहरा ही अनेकांची सामान्य तक्रार आहे. (Natural remedies for pimples)
महागडी क्रीम, सीरम वापरूनही अपेक्षित फरक पडत नाही, उलट काही वेळा त्वचा अधिक संवेदनशील होते. अँटी-डँड्रफ शॅम्पू आणि क्रीम वापरूनही अपेक्षित फरक पडत नाही. अशावेळी जुन्या काळातील, आजीबाईंचे घरगुती उपाय उपयोगी ठरतात. त्यापैकीच एक प्रभावी आणि कमी खर्चिक उपाय म्हणजे तुरटीचा योग्य वापर. (Dandruff home treatment)
तुरटी ही नैसर्गिक घटक असून त्वचा स्वच्छ ठेवण्यास, जंतुसंसर्ग कमी करण्यास आणि अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मात्र तुरटी थेट चेहऱ्यावर लावणं टाळावं. योग्य प्रमाणात आणि इतर घटकांसोबत वापरली तरच ती सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. पाहूया त्वचेवर तुरटी कशी लावायला हवी.
तुरटीची पावडर मधात मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे डाग आणि मुरुमांची समस्या देखील कमी होते. पण तुरटीचा वापर अतिप्रमाणात चेहऱ्यावर करु नका.
चेहऱ्यावर लहान-मोठे मुरुमे येणे ही सामान्य गोष्ट आहे. मुरुमे घालवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण त्याचा फारसा फरक पडत नाही. अशावेळी आपण तुरटीमध्ये हळद मिसळून चेहऱ्याला लावल्यास फायदा होईल.
खोबऱ्याच्या तेलात तुरटी पावडर मिसळून लावल्याने टाळूवरील कोंडा दूर होतो. ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाही. तसेच त्वचा तेलकटही होत नाही.
तुपात तुरटी मिसळून फुटलेल्या ओठांना आणि काळपटलेल्या जागी लावल्यास बरे होण्यास मदत होते. यामुळे ओठ पुन्हा मऊ, गुलाबी होतात.
तुरटी तांदळाच्या पाण्यात मिसळून केसांना लावल्याने कोरडे, निर्जीव केसांना पुन्हा जीव येतो. यामुळे आपले केस मऊ आणि चमकदार होतात. तुरटीचा वापर आपण जपून करायला हवा. अन्यथा केसांच्या समस्या वाढतील. गुलाबपाण्यात तुरटी पावडर मिसळून या दोन्ही घटकांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने छिद्रे उघडण्यास मदत होते.