टॅनिंग वाढल्याने चेहरा काळवंडला? त्वचेचा काळेपणा घालविण्यासाठी जावेद हबीब सांगतात खास उपाय
Updated:May 26, 2025 12:55 IST2025-05-26T12:45:04+5:302025-05-26T12:55:13+5:30

ऊन, प्रदुषण यामुळे त्वचा टॅन होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. नियमितपणे क्लिझिंग, स्क्रबिंग, फेशियल केल्यास हा त्रास कमी होऊन चेहरा पुन्हा उजळू शकतो.(how to remove tanning?)
पण अनेक जणींना त्यासाठी पुरेसा वेळ काढून पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं. म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय करून तुम्ही चेहऱ्याचं सौंदर्य नक्कीच खुलवू शकता.(home made face pack for removing tanning and dead skin)
त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी घरच्याघरी काय उपाय करता येईल, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(coffee face pack for glowing skin)
यामध्ये ते सांगतात की हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या. कॉफी प्यायल्याने आपल्याला जशी एनर्जी येते, फ्रेश वाटते तसंच काहीसं आपल्या त्वचेचंही होतं.
जेव्हा आपण त्वचेवर कॉफीचा एखादा फेसमास्क लावतो तेव्हा कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि काही पौष्टिक घटक त्वचेला टवटवीत करण्यासाठी मदत करतात. नॅचरल स्क्रबर म्हणूनही कॉफी ओळखली जाते.
आता १ चमचा काॅफीमध्ये १ चमचा मध घाला. मध त्वचेला नॅचरली हायड्रेटेड ठेवण्यास मदत करताे. मधात असणाऱ्या काही घटकांमुळे त्वचेचा खरखरीतपणा कमी होऊन त्वचा छान मुलायम होते.
मध आणि काॅफी एकत्र करून हा मास्क तुमच्या चेहऱ्याला लावा. ५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
टॅनिंग आणि डेडस्किन निघून गेल्याने चेहरा अगदी फ्रेश दिसेल.