पिंपल्स- फोडांच्या डागांमुळे चेहरा विद्रूप दिसतो? रात्री झोपण्यापूर्वी करा ५ उपाय , डाग गायब- चेहऱ्यावर येतं तेज
Updated:August 15, 2025 18:05 IST2025-08-15T18:00:00+5:302025-08-15T18:05:01+5:30
Pimples and acne scar removal tips: Night skincare for glowing skin : रात्री झोपण्यापूर्वी हे ५ खास उपाय करुन बघा, ज्यामुळे डाग कमी होऊन त्वचेवर ग्लो येईल.

वाढत्या पिंपल्स आणि फोडांच्या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. त्वचेची काळजी न घेतल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डाग घालवण्यासाठी अनेकजण त्वचेवर लेझर ट्रिटमेंट किंवा पीलिंग ट्रीटमेंट घेतात. (Pimples and acne scar removal tips)
आपल्या देखील पिंपल्स किंवा फोडांचे डाग घालवायचे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी हे ५ खास उपाय करुन बघा, ज्यामुळे डाग कमी होऊन त्वचेवर ग्लो येईल. (Night skincare for glowing skin)
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून ४ ते ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. तासाभरानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील रक्ताभिसरण सुधारेल.
लिंबाचा रस कापसाच्या बोळ्यांने त्वचेवर लावा. १० ते १५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस त्वचेवर लावल्याने जळजळ होत असेल तर लगेच त्वचा पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेला चमक मिळेल.
बटाट्याचा रस त्वचेची चमक वाढवण्यास मदत करते. जर आपल्या त्वचेवरील डाग दूर करायचे असतील तर रात्री बटाट्याचा रस लावा. २० मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. बटाट्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत. ज्यामुळे डाग आणि फ्रिकल्स दूर होण्यास मदत होते.
टोमॅटोचा रस चेहऱ्यावरील डाग हलके करण्यास मदत करतात. यासाठी आपल्याला ३ ते ४ मिनिटे चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावून हलक्या हाताने मालिश करा. आठवड्यातून दोन वेळा असं केल्याने फायदा होईल.