नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, खाज सुटते? ४ उपाय - आठवड्याभरात काळपटपणा होईल दूर
Updated:September 1, 2025 19:05 IST2025-09-01T19:00:00+5:302025-09-01T19:05:01+5:30
Intimate area skin care: Dark skin around private parts: Natural remedies for skin darkness: काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण प्रायव्हेट पार्टचा आठवड्याभरात काळेपणा दूर करु शकतो.

आपल्या प्रत्येकाला शरीराची स्वच्छता राखता यायला हवी. चेहरा, मान, हातांच्या किंवा पायांच्या स्वच्छतेची काळजी आपण घेतो पण प्रायव्हेट पार्टकडे सहज दुर्लक्ष करतो. पण ती जागा स्वच्छ करणं देखील अधिक महत्त्वाचे आहे. (Intimate area skin care)
जर आपण नियमितपणे प्रायव्हेट पार्ट नियमितपणे स्वच्छ केले नाही तर तिथे घाण साचते, काळपट पडते इतकेच नाही तर खाज देखील सुटते. अशावेळी आपण महागड्या क्रीम्स वापरतो. यामुळे आग होऊन लालसरपणा देखील येतो. पण काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण आठवड्याभरात काळेपणा दूर करु शकतो.(Dark skin around private parts)
आपण बेसन आणि लिंबाची पेस्ट करुन प्रायव्हेट पार्टला लावू शकतो. लिंबूमध्ये असणारे घटक त्वचेचा रंगद्रव्य कमी करते. बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. बेसन, लिंबाचा रस आणि थोडी हळद मिसळून पेस्ट बनवा. आणि १५ मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ करा.
त्वचेवर दही लावून हलक्या हाताने घासा.दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. जे ब्लीचिंगचे काम करते. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
बटाटाचा रस हा काळेपणा, डाग दूर करण्यास मदत करोत. याचा रस कापसाच्या मदतीने काळपटपणावर लावा. यात असणारे ब्लीचिंग घटक त्वचा स्वच्छ करते.
पपई केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील चांगली आहे. याची पेस्ट बनवू खाजगी जागेवर लावा. थोड्यावेळाने पाण्याने स्वच्छ केल्यास काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.