Join us

केसांना च्युइंगम चिकटले तर कसे काढायचे? ५ सोपे उपाय - च्युइंगम निघेल सहज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 19:25 IST

1 / 7
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना च्युइंगम खायला अधिक आवडते. परंतु, अनेकदा खाल्ल्यानंतर आपण ते सहजच इथे-तिथे फेकून देतो. ज्यामुळे ते कुठेही चिकटते. (How to remove chewing gum from hair)
2 / 7
बरेचदा लहान मुले च्युइंगम असे फेकून देतात ज्यामुळे ते केसांना चिकटण्याची अधिक जास्त शक्यता असते. जर आपल्याला केसांना च्युइंगम चिकटले तर ५ सोपे उपाय लक्षात ठेवा. (Chewing gum stuck in hair solutions)
3 / 7
केसांना च्युइंगम चिकटले तर नारळ, ऑलिव्ह किंवा राईचे तेल लावा. बोटांनी किंवा कापसाच्या सहाय्याने हलक्या हाताने मालिश करा.
4 / 7
च्युइंगम चिकटलेल्या ठिकाणी बर्फाचा तुकडा १० ते १५ मिनिटे घासून घ्या. ज्यामुळे ते कडक होऊन केसांपासून वेगळे होईल.
5 / 7
पीनट बटर च्युइंगमवर लावा ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कंगवा किंवा बोटांनी हळूहळू काढा.
6 / 7
च्युइंगम असलेल्या केसांच्या त्या भागावर व्हॅसलीन लावा. १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने घासून घ्या.
7 / 7
केसांच्या ज्या भागांना च्युइंगम चिकटले आहे त्या भागावर कंडिशनर लावा. थोडा वेळ राहू द्या, त्यानंतर कंगव्याने केस विंचरा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी