केसांना च्युइंगम चिकटले तर कसे काढायचे? ५ सोपे उपाय - च्युइंगम निघेल सहज
Updated:May 8, 2025 19:25 IST2025-05-08T19:21:47+5:302025-05-08T19:25:00+5:30
How to remove chewing gum from hair: Chewing gum stuck in hair solutions: आपल्याला केसांना च्युइंगम चिकटले तर ५ सोपे उपाय लक्षात ठेवा.

अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना च्युइंगम खायला अधिक आवडते. परंतु, अनेकदा खाल्ल्यानंतर आपण ते सहजच इथे-तिथे फेकून देतो. ज्यामुळे ते कुठेही चिकटते. (How to remove chewing gum from hair)
बरेचदा लहान मुले च्युइंगम असे फेकून देतात ज्यामुळे ते केसांना चिकटण्याची अधिक जास्त शक्यता असते. जर आपल्याला केसांना च्युइंगम चिकटले तर ५ सोपे उपाय लक्षात ठेवा. (Chewing gum stuck in hair solutions)
केसांना च्युइंगम चिकटले तर नारळ, ऑलिव्ह किंवा राईचे तेल लावा. बोटांनी किंवा कापसाच्या सहाय्याने हलक्या हाताने मालिश करा.
च्युइंगम चिकटलेल्या ठिकाणी बर्फाचा तुकडा १० ते १५ मिनिटे घासून घ्या. ज्यामुळे ते कडक होऊन केसांपासून वेगळे होईल.
पीनट बटर च्युइंगमवर लावा ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कंगवा किंवा बोटांनी हळूहळू काढा.
च्युइंगम असलेल्या केसांच्या त्या भागावर व्हॅसलीन लावा. १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने घासून घ्या.
केसांच्या ज्या भागांना च्युइंगम चिकटले आहे त्या भागावर कंडिशनर लावा. थोडा वेळ राहू द्या, त्यानंतर कंगव्याने केस विंचरा.