कानाचं छिद्र खूपच मोठे झाले? ६ उपाय- ओघळलेल्या कानांतही सुंदर दिसतील कानातले
Updated:March 12, 2026 18:09 IST2026-03-11T12:47:49+5:302026-03-12T18:09:20+5:30
How To Reduce Ear Holes : जर छिद्र खूपच मोठं झालं असेल किंवा कान फाटला असेल तर घरगुती उपायांनी ते भरून येत नाही. अशावेळी लोब्युलोप्लास्टी नावाची छोटी शस्त्रक्रिया किंवा लेझर ट्रिटमेंट करून छिद्र पुन्हा लहान करून घेता येतात.

जड कानातल्यांमुळे कानांचे छिद्र ओढले जाणे किंवा मोठे होणे ही समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येते. जर ही समस्या खूपच गंभीर नसेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून ते छिद्र अधिक मोठं होण्यापासून वाचवू शकता. (How To Reduce Ear Hole Size Naturally At Home)
जड कानातले घालणं बंद करा
सर्वात महत्वाचं म्हणजे काही काळ जड कानातले घालणं पूर्णपणे थांबवा. सततच्या वजनामुळे छिद्र अधिक ताणले जातात. शक्य असल्यास काही दिवस कानात काही घालणंच टाळा. (How To Reduce Ear Holes)
इअर लोब पॅचेच
बाजारात पारदर्शक इअर लोब पॅचेच मिळतात. कानाच्या मागे हे पॅच लावल्यामुळे कानातल्यांचे वजन छिद्रांवर न पडता पॅचवर पडते. यामुळे छिद्र अधिक मोठे होत नाहीत.
मेडीकल टेप किंवा बँड एड
जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी जड कानातले घालायचे असतील तर तर कानांच्या मगे त्वचेच्या रंगांची सर्जिकल टेप लावा. यामुळे कानांना आधार मिळतो आणि छिद्रावर ताण येत नाही.
एरंडेल तेल
दररोज रात्री झोपण्यापूर्वी कानाच्या छिद्रावर एरंडेल तेल लावून हलक्या हातानं मसाज करा. एरंडेल तेलामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. ज्यामुळे छिद्र नैसर्गिकरित्या थोडे आकुंचन पावू शकते.
खोबरेल तेल आणि कोरफड जेल
कोरफड तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्याने तिथली त्वचा लवचिक राहते आणि जखम भरून येण्यास मदत होते. जर छिद्र नुकतंच ओढलं गेलं असेल तर ते मिश्रण फायदेशीर ठरते.
शस्त्रक्रिया
जर छिद्र खूपच मोठं झालं असेल किंवा कान फाटला असेल तर घरगुती उपायांनी ते भरून येत नाही. अशावेळी लोब्युलोप्लास्टी नावाची छोटी शस्त्रक्रिया किंवा लेझर ट्रिटमेंट करून छिद्र पुन्हा लहान करून घेता येतात.