Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केस धुण्यासाठी 'या' पद्धतीने जादुई पाणी तयार करा, केस गळणं बंद होऊन वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 12:33 IST

1 / 7
केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल किंवा केसांना अजिबातच वाढ नसेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने केस धुण्यासाठी पाणी तयार करा आणि त्यानेच नियमितपणे केस धुवा..
2 / 7
हे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये २ ग्लास पाणी घ्या. या पाण्यामध्ये २ चमचे चहा पावडर घाला.
3 / 7
त्यानंतर त्यामध्ये १ चमचा तुम्ही नेहमी वापरत असलेला शाम्पू घाला.
4 / 7
तसेच त्यानंतर त्यामध्ये कडिपत्त्याची १० ते १५ पाने घाला. कडिपत्त्याची पाने केसांची मुळं पक्की करण्यासाठी मदत करतात.
5 / 7
यानंतर या पाण्यात २ चमचा मेथी दाणे घाला. हे पाणी ५ ते ७ मिनिटे उकळवून घ्या आणि त्यानंतर ते गाळून घ्या.
6 / 7
आता केस धुण्यासाठी हे पाणी वापरा. केसांवर ते हळूहळू टाका आणि बोटाच्या टोकांनी मसाज करत केस धुवा.
7 / 7
यामुळे केसांची मुळं पक्की होतील. स्काल्पला चांगल्याप्रकारे रक्तप्रवाह होईल आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊन केसांची वाढही चांगली होईल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा अशी माहिती ब्यूटी एक्सपर्टने coachshivangidesai या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी