Join us

भेंडीचे पाणी केसांसाठी वरदान! कोरडेपणा- फ्रिझीनेस आणि केसगळतीवर सोप्यात सोपा असरदार उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 11:05 IST

1 / 11
आजकाल प्रत्येकजण केसांच्या अनेक समस्यांनी हैराण (Benefits of Using Okra Water For Healthy Hair Growth) असल्याचे दिसते. केसांच्या या अनेक समस्यांमुळे केसांचा नैसर्गिक (How To Use Bhindi Water For Hair) पोत बिघडून ते रुक्ष, निस्तेज दिसू लागतात. असे असले तरी देखील सगळ्यांना आपले केस घनदाट, काळेभोर, लांबसडक, मऊमुलायम, सिल्की आणि शायनी हवे असतात.
2 / 11
आपल्याला हवे तसे आपले केस कधीच नसतात. यासाठी आपण केसांवर (How to make Okra or Bhindi water gel for incredible hair growth) अनेक महागड्या ट्रिटमेंट्स, उपचार करुन घेतो. परंतु या महागड्या ट्रिटमेंट्स, उपचार करण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. इतकंच नव्हे तर, एवढं करून देखील काहीवेळा याचा उपयोग होत नाही.
3 / 11
यासाठीच, केसांच्या अनेक समस्या दूर करून त्यांना शायनी आणि सिल्की करण्यासाठी आपण चक्क भेंडीचा वापर करू शकतो.
4 / 11
केसांसाठी भेंडीचा वापर करण्यासाठी, सगळ्यात आधी ४ ते ५ मध्यम आकाराच्या भेंडी घ्या. आता या भेंडी कापून त्यांचे लहान तुकडे करा. मग दोन कप पाण्यात टाका आणि १५ मिनिटे उकळवा.
5 / 11
जेव्हा हे पाणी व्यवस्थित उकळते आणि जेलसारखे घट्ट होऊ लागते तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. यानंतर हे भेंडीचे पाणी थोडे थंड होऊ द्यावे. हे पाणी थंड झाल्यावरच केसांसाठी वापरावे.
6 / 11
केसांसाठी भेंडीचे पाणी वापरण्यासाठी, सर्वात आधी केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. केस पूर्णपणे स्वच्छ झाल्यावर केसांना कंडिशनर लावण्याऐवजी केसांना भेंडीचे पाणी लावा.
7 / 11
आता कमीत कमी १५ मिनिटे हे पाणी केसांवर असेच राहू द्या. १५ मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुवा आणि नंतर त्याचा परिणाम पहा. आठवड्यातून दोनदा हे पाणी वापरून तुम्ही तुमचे केस मऊसूत, रेशमी करु शकता.
8 / 11
भेंडीमध्ये नैसर्गिक स्लिमी (चिकटसर) गुणधर्म असतात, जे केसांना मॉइश्चराईज करतात, फ्रिझ कमी करतात आणि नैसर्गिक चमक आणतात.
9 / 11
भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे केसांच्या मुळांना बळकटी देतात आणि गळती रोखतात.
10 / 11
भेंडीचं पाणी हे घरगुती, केमिकल्स फ्री कंडिशनर आहे, जे केसांना गुळगुळीत आणि चमकदार ठेवतं.
11 / 11
भेंडीचं चिकटसर जेल केसांवर एक नैसर्गिक थर तयार करतं, ज्यामुळे केसांना नैसर्गिकपणे चमकदारपणा येतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी