1 / 9पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी बाजारात विकत मिळणारे केमिकलयुक्त डाय वापरायला अनेकांना भीती वाटते.(how to make natural hair dye colour at home?)2 / 9शिवाय केसांना मेहेंदी लावल्यानंतर त्यांना येणारा लालसर रंगही खूप जणांना आवडत नाही.3 / 9म्हणूनच केस काळे करण्यासाठी घरच्या घरी नॅचरल हेअर डाय कसा तयार करायचा ते पाहूया. ही पद्धत selfcarebysuman या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.4 / 9यासाठी सगळ्यात आधी केसांना मेहेंदी लावायची आहे. त्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये पाणी घ्या. त्यात चहा पावडर घालून पाणी उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.5 / 9 गाळून घेतलेल्या पाण्यात कॉफी पावडर घाला. कॉफी पावडर पाण्यात पुर्णपणे मिसळल्यानंतर त्यात मेहेंदी घाला. आता ही मेहेंदी ८ ते १० तास भिजू द्या.6 / 9त्यानंतर जेव्हा तुम्ही केसांना मेहेंदी लावणार असाल त्याच्या आधी मेहेंदीमध्ये बीटरुटचा रस घाला आणि त्यानंतर ती मेहेंदी केसांना लावा.7 / 9यानंतर २ ते ३ तासांनी नुसत्या पाण्याने केस धुवून टाका. शाम्पू करू नका.8 / 9यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे. एका वाटीमध्ये इंडिगो पावडर घ्या. त्यात पाणी टाकून ती कालवा आणि मेहेंदीप्रमाणे केसांना लावा.9 / 9हा मास्क केसांवर पाऊण ते १ तास ठेवा. त्यानंतर शाम्पू करून केस धुवून टाका. केसांना खूप छान रंग तर आलेला असेलच पण त्यांच्यावर एक वेगळीच चमकही दिसेल. हा उपाय करण्यापुर्वी पॅचटेस्ट जरुर घ्या.