विकतच्या क्रिमची गरजच नाही- घरीच बनवा तुरटीचं क्रीम, पिंपल्स- टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल सुंदर चमक
Updated:March 27, 2026 15:14 IST2026-03-27T15:09:06+5:302026-03-27T15:14:53+5:30

त्वचेच्या कित्येक तक्रारी कमी करण्यासाठी तुरटी अतिशय उपयुक्त ठरते. अगदी पिंपल्स, टॅनिंग, ॲक्ने असे कित्येक त्रास कमी करण्यासाठी तुटीचा खूप चांगला उपयोग होतो. त्यासाठी पुढे सांगितलेल्या एका खास पद्धतीने तुरटीचं क्रिम घरीच तयार करा आणि काही दिवस वापरून पाहा.(how to make moisturising lotion by using fitkari?)
हा उपाय करण्यासाठी पितळाचं एक पसरट भांडं घ्या. त्यामध्ये २५० ग्रॅम एवढी तुरटीची पावडर घाला.(homemade cream using fitkari)
त्यामध्येच ५० मिली खोबरेल तेल, २० मिली ॲलोव्हेरा जेल घाला.
तसेच २० मिली ग्लिसरीन आणि चिमूटभर हळद घाला.
आता बर्फाचा एक तुकडा घेऊन तो या पदार्थांमध्ये ठेवा आणि हाताने गोलाकार दिशेने काही मिनिटे सलग फिरवत राहा.
जोपर्यंत त्या भांड्यात क्रिमसारखा घट्ट पदार्थ तयार होत नाही तो पर्यंत बर्फ फिरवत राहावा. त्यानंतर तयार झालेलं क्रिम एका डबीमध्ये भरून ठेवा.
हे क्रिम तुम्ही पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी वापरू शकता. तसेच त्वचेवरचं टॅनिंग घालविण्यासाठीही या क्रिमचा उपयोग होतो.एवढंच नाही तर चटका बसला, काहीतरी लागलं असेल, रॅश आली असेल तर अशा ठिकाणीही हे क्रिम लावून पाहा. लगेच बरं वाटेल.