1 / 6डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी आपल्याकडे अगदी जुन्या काळापासून काजळ लावण्याची प्रथा आहे. डोळ्यांचे सौंदर्य खुलविणे हाच काजळ लावण्याचा एकमेव हेतू नाही. कारण आयुर्वेदिक पद्धतीने जे औषधी काजळ तयार केले जाते, ते डोळ्यांसाठी आरोग्यदायीही ठरते.2 / 6हल्ली बऱ्याच जणी ब्रँडेड काजळ विकत घेतात. त्याची किंमतही खूप जास्त असते. असे विकतचे काजळ घेण्यापेक्षा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने काजळ तयार करता येतं. ते कसं करायचं याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे3 / 6हे काजळ तयार करण्यासाठी आपल्याला ५ ग्रॅम बदाम, २ ग्रॅम भिमसेनी कापूर आणि ५ ग्रॅम त्रिफळा पावडर लागणार आहे.4 / 6त्यासाठी कापसाचा एक उभट तुकडा घ्या. त्यामध्ये वरील सगळे पदार्थ भरा आणि त्याची वात तयार करा.5 / 6ही वात एका पणतीमध्ये किंवा दिव्यामध्ये ठेवा आणि त्यात साजूक तूप घाला. यानंतर हा दिवा लावा. त्या दिव्यावर एक ताटली किंवा लोखंडाचे भांडे घेऊन काजळी धरा.6 / 6काजळी जमा झाल्यानंतर एखादी टोकदार वस्तू घेऊन भांड्यावर जमा झालेली काजळी एखाद्या डबीत काढा. त्यात अगदी थेंबभर तूप घातले की छान काजळ झाले तयार.