1 / 6हिवाळ्यात त्वचा आणि केस दोन्हीही खूप कोरडे पडतात. काही जणींचे केस तर अगदी झाडूसारखे राठ, निस्तेज होतात.(winter care tips for hair)2 / 6अशा केसांना पुन्हा एकदा छान सिल्की, शायनी आणि मऊ- मुलायम करायचं असेल तर कोरफडीचा गर खूप उपयुक्त ठरतो (how to get rid of dry hair problem in winter?). कोरफडीच्या गराचा केसांसाठी कसा वापर करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ mucherla.aruna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to make aloe vera gel at home for silky and shiny hair?)3 / 6हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी कोरफडीचे तुकडे करून घ्या आणि ते १० ते १२ तासांसाठी तसेच ठेवून द्या. या व्हिडीओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कोरफड तोडल्यानंतर लगेच ती वापरू नये. कारण बऱ्याच जणांना ती सहन होत नाही. तोडल्यानंतर ती कमीतकमी १० ते १२ तास तशीच ठेवावी आणि त्यानंतर वापरावी.4 / 6आता एका भांड्यात कोरफडीचा गर काढून घ्या आणि त्यामध्ये खोबरेल तेल टाका. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही बदाम तेलही वापरू शकता.5 / 6कोरफड आणि तेल व्यवस्थित एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर पाऊण ते एक तासाने केस धुवून टाका.6 / 6केस अतिशय सिल्की, शायनी आणि चमकदार झालेले जाणवतील.