1 / 9१. आपल्याकडे कॉन्फिडन्स असतो, पण तो दाखवताच येत नाही.. म्हणूनच तर एखाद्याशी बोलताना लक्षात ठेवा या काही खास गोष्टी आणि दाखवून द्या तुमच्यातला कॉन्फिडन्स..2 / 9२. बऱ्याच जणांना छळणारा प्रॉब्लेम म्हणजे कॉन्फिडन्सच नसणे.. या मंडळींना येतं सगळं. पण आत्मविश्वास नसल्याने मग सगळीच पंचाईत होऊन जाते आणि सगळं येऊनही, सगळ्या गोष्टींची माहिती असूनही केवळ ती व्यवस्थित मांडता न आल्याने अपेक्षित यश मिळत नाही.3 / 9३. म्हणूनच इंटरव्ह्यूला जाताना किंवा मग ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन देताना किंवा मग कुठेही जिथे तुम्ही कॉन्फिडन्सने बोलण्याची किंवा कॉन्फिडन्ट राहण्याची गरज असेल, तिथे या काही टिप्स वापरून बघा. नक्कीच कॉन्फिडन्ट वाटू लागेल.4 / 9४. इंटरव्ह्यूला गेल्यावर किंवा मग मिटिंगमध्ये बसल्यावर अंग चोरून बसू नका. खुर्चीवरची जागा व्यवस्थित उपयोगात आणा आणि मोकळं बसा.5 / 9५. बसल्यावर तुमच्या खांद्यांकडे फोकस करा. खांदे झुकलेले नाहीत ना, एकदा तपासून बघा. खांदे मागे ओढून पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा.6 / 9६. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात, त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. नजर चुकवत बोलल्याने किंवा त्याच्या डोळ्यात न पाहता इतरत्र पाहून बोलल्याने तुमच्यात कॉन्फिडन्स कमी आहे, हे चटकन लक्षात येतं. 7 / 9७. बोलताना भुवया आक्रसून घेऊ नका. आक्रसलेल्या भुवयाही आत्मविश्वासाची कमतरता दाखवतात.8 / 9८. बोलताना कायम तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. एकदम सपाट चेहऱ्याने किंवा खूप जास्तच हसून बोलू नका.9 / 9९. चेहरा खूप खाली ठेवून बोलू नका. समोरच्याशी बोलताना हनुवटी किंचित वर उचला. म्हणजे चेहरा उंचावलेला आणि अधिक आत्मविश्वासू दिसेल.