उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

Updated:April 8, 2026 16:05 IST2026-04-08T15:58:19+5:302026-04-08T16:05:28+5:30

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

उन्हाचा कडाका वाढला की त्याचे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. ज्यांना कडक उन्हातच घराबाहेर पडावं लागतं त्यांना सनबर्न, टॅनिंग (tanning and sunburn) असे त्रास होतच असतात.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

सनबर्न झाल्यावर त्वचेवर काही हळुवार उपचार करणं गरजेचं असतं. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया (home hacks to reduce tanning and sunburn).. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ (nutmeg) वापरायचं आहे.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

त्यासाठी सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये जायफळाची पावडर घ्या. साधारण अर्धा चमचा जायफळ पावडर असेल तर त्यामध्ये तेवढीच कॉफी पावडर घाला.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

आता या मिश्रणात १ चमचा मध घाला. मध त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

त्यानंतर त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. आता सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या आणि नंतर टॅन झालेल्या त्वचेवर लावा. १० मिनिटांनी हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या. यानंतर त्वचा मॉईश्चराईज करा. टॅनिंग निघून जाईल.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

याशिवाय सनबर्न झालेल्या ठिकाणी काही मिनिटांसाठी दही लावून ठेवल्यासही चांगला फरक पडतो.

उन्हामुळे सनबर्नचा त्रास- टॅनिंगही वाढलं? जायफळाचा 'असा' लेप लावा, काळवंडलेली त्वचा होईल उजळ

साजुक तूप, लोणी किंवा फ्रिजमधली थंड साय, थंड दूध असे पदार्थही सनबर्नचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात.