टॅनिंग वाढलं, त्वचा डल दिसते, ग्लो कमी झाला? तिन्ही समस्यांवर १ उपाय- चेहऱ्यावर येईल तेज
Updated:July 26, 2025 18:09 IST2025-07-26T16:40:22+5:302025-07-26T18:09:49+5:30

हा एक खास उपाय प्रत्येकीलाच माहिती असावा.. कारण अवघ्या काही मिनिटांत घरच्याघरी तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल तर हा उपाय खूप कामी येणारा आहे.
डेडस्किन, टॅनिंग यांचं प्रमाण वाढलं असेल, त्वचा खूपच डल दिसत असेल किंवा त्वचेवरचा ग्लो कमी झाला असेल तर हा उपाय नक्की करून पाहा.
कधी कधी असंही होतं की आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं असतं. पण त्यापुर्वी फेशियल, क्लिनअप करायला पार्लरमध्ये जाणं होतच नाही. अशावेळी हा उपाय नक्की उपयोगी ठरू शकतो.
हा उपाय करण्यासाठी १ चमचा मसूर डाळ भाजून तिची पावडर करून घ्या. तसेच हळदही भाजून घ्या.
आता यामध्येच १ चमचा ज्येष्ठमधाची पावडर घाला. ज्येष्ठमधामुळे त्वचेवरचं पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.
आता या तिन्ही पावडरमध्ये १ चमचा दही आणि १ चमचा टोमॅटोचा रस घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा.
साधारण १५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका आणि चेहरा धुवून टाका. त्वचेवर खूप छान चमक येईल.