चेहऱ्यावर सतत येणाऱ्या ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्समुळे वैतागलात? ३ उपाय- त्वचा होईल स्वच्छ, नितळ
Updated:February 6, 2025 15:15 IST2025-02-06T14:41:19+5:302025-02-06T15:15:38+5:30

चेहऱ्यावर जर नेहमीच ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येत असतील तर ते कमी करण्यासाठी काय उपाय करायचे ते पाहुया..(how to get rid of black heads and white heads)
हे उपाय rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेले आहेत. हे काही उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.(best home remedies to remove blackheads and whiteheads )
आपल्या त्वचेमध्ये जेव्हा अतिरिक्त प्रमाणात सेबम किंवा तेल तयार होतं तेव्हा ते त्वचेवर असणाऱ्या छिंद्रांमधून त्वचेबाहेर येतं. त्वचा जर व्यवस्थित स्वच्छ झाली नाही तर त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि त्यातूनच ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स तयार होतात.
त्यामुळे सगळ्यात आधी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करायला हवी. यासाठी दिवसातून २ वेळा फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एखादं माईल्ड क्लिंजर वापरा.
आठवड्यातून १ - २ वेळा वाफ घ्या आणि वाफ घेतल्यानंतर त्वचेला मुलतानी माती किंवा असाच एखादा मास्क जरूर लावा.
आठवड्यातून एकदा त्वचा स्क्रब करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते.
त्वचेला आठवड्यातून दोन ते तीन वेळा सॅलिसालिक ॲसिड सेरम लावा. हे सगळे उपाय केल्यास ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सची समस्या बऱ्यापैकी कमी होऊन त्वचा छान स्वच्छ, नितळ होईल.