Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फेशियल- क्लिनअप करायला वेळ नाही? इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी वापरा १ खास पदार्थ, चेहरा लगेच चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2023 14:01 IST

1 / 7
दांडिया खेळायला जायचंय, पण पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करायला वेळच मिळेना.... असं असेल तर स्वयंपाक घरातला हा एक पदार्थ लगेच बाहेर काढा...
2 / 7
थकवा आल्यावर तो घालविण्यासाठी आणि पुन्हा फ्रेश होण्यासाठी कॉफी पिता ना... मग असाच आता त्वचेचा थकवा घालविण्यासाठी आणि त्वचेची हरवलेली चमक पुन्हा मिळविण्यासाठी कॉफी वापरून पाहा....
3 / 7
कॉफीमध्ये असणारे काही घटक त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतात. त्यामुळे जेव्हा फेशियल करायला वेळ नसेल तेव्हा कॉफी खूप उपयुक्त ठरते.
4 / 7
चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कॉफीचा कसा वापर करायचा, ते आता पाहूया... यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता.
5 / 7
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि मध सम प्रमाणात घेऊन व्यवस्थित कालवून घ्या. चेहरा थोडा ओलसर करा आणि हा लेप चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावा. यानंतर १० मिनिटाने चेहरा धुवून टाका.
6 / 7
दुसरा उपाय करण्यासाठी १ टीस्पून कॉफी घ्या, त्यात अर्धा टीस्पून पिठीसाखर टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा. चेहऱ्याचं खूप चांगल्याप्रकारे स्क्रबिंग होईल.
7 / 7
तिसरा उपाय करण्यासाठी १ टीस्पून कॉफी, १ टीस्पून हळद एका वाटीत घ्या. त्यात लिंबू पिळून हे मिश्रण कालवून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावा. ५ मिनिटे गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर २ ते ३ मिनिटे हे मिश्रण तसेच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवून टाका.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023ब्यूटी टिप्सहोम रेमेडीदांडिया