संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

Updated:January 19, 2026 15:22 IST2026-01-19T15:16:46+5:302026-01-19T15:22:22+5:30

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

पुढचे काही दिवस महिलांच्या मागे हळदी- कुंकू कार्यक्रमाची लगबग असणार आहे. त्यानिमित्ताने सुंदर साड्या नेसणे, वेगवेगळे दागिने घालणे, नटणे- थटणे आलेच.. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याची काळजी घेणं होत नाही. त्यामुळे मग हळदी- कुंकू कार्यक्रमाला जाताना चेहऱ्यावर म्हणावा तसा ग्लो येत नाही.(how to get instant glow?)

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

आता असंच तुमच्याही बाबतीत होत असेल तर खूप वेळ न घालवता घरच्याघरी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. कुठेही बाहेर जाण्यापुर्वी जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.(how to get diamond facial like glow at home?)

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घ्या. त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचा चमकदार करण्यासाठी तांदळाचं पीठ खूप उपयुक्त ठरतं.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

त्यात थोडा मध घाला. त्वचेला छान पोषण देऊन त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मध खूप महत्त्वाचा आहे.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

यानंतर त्या मिश्रणात १ चमचा ग्लिसरीन घाला. ग्लिसरीन चेहऱ्यासाठी नियमितपणे वापरल्यास चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स कमी होतात आणि शिवाय त्वचेवर छान चमक येण्यास सुरुवात होते.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

सगळ्यात शेवटी या मिश्रणात थोडी मिल्क पावडर किंवा मग कच्चे दूध घाला. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि हा लेप चेहऱ्याला लावा.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

५ ते ६ मिनिटांनी हळूवार हाताने चेहरा चोळून धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.