५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

Updated:August 12, 2025 13:52 IST2025-08-12T13:44:26+5:302025-08-12T13:52:47+5:30

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

त्वचेचं सौंदर्य जर नैसर्गिकपणे वाढवत न्यायचं असेल तर त्यासाठी काही पदार्थ आवर्जून खायलाच हवेत.(how to enhance your beauty naturally?)

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

त्या पदार्थांमुळे शरीरातलं कोलेजीन वाढतं. त्यामुळे मग त्वचा दिर्घकाळ तरुण, सुंदर राहण्यास मदत होते. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(5 foods that helps to boost collagen and keep your skin young and glowing)

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली कोलेजीन निर्मिती वाढते. त्यामुळे सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर आवळा तुमच्या आहारात नेहमीच असायला हवा.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

ज्येष्ठमधामध्ये देखील कोलेजीन चांगल्या प्रमाणात असते. शरीरावरच्या जखमा भरून काढण्यासाठी तसेच त्वचेमधील टिश्यूंसाठी ज्येष्ठमध अतिशय गुणकारी ठरतो.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

अश्वगंधामुळे शरीरातला स्ट्रेस आणि कोर्टीसोल हार्मोन कमी होण्यास मदत होते. जेव्हा हे दोन्ही कमी होतात तेव्हा आपोआपच शरीरातलं कोलेजीन वाढतं. त्यामुळे अश्वगंधाही तारुण्य, सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

सुकामेवा आणि वेगवेगळ्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि झिंक असते. या दोन्ही घटकांमुळे शरीरातलं कोलेजीन वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या आहारात या दोन्ही गोष्टी नियमितपणे असायला हव्या.

५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही..

शतावरीमुळे त्वचेमधली लवचिकता टिकून राहाते. त्यामुळे त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येत नाहीत. त्वचा तरुण, टवटवीत दिसते.