Join us

चेहऱ्यासाठी परफेक्ट आयब्रो कशी निवडाल? पाहा ६ प्रकार आणि आयब्रो जाड होण्यासाठी खास टिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 16:01 IST

1 / 8
सगळ्याच महिला विविध ब्यूटी ट्रिटमेंट करत नाहीत. मात्र महिन्यातून एक फेरी ब्यूटी पार्लरला होतेच, ती आयब्रो थ्रेडींगसाठी. आयब्रो छान असतील तर चेहरा अगदी वेगळा दिसतो.
2 / 8
आयब्रोमध्येही प्रकार असतात. शक्यतो ब्यूटीशन आपल्याला विचारुन आकार देत नाही. त्या आपल्या आयब्रोचा आकार पाहून स्वत: ठरवतात की कोणता आकार द्यायचा. पण तुम्ही तुमच्या चेहर्‍याला कोणता आकार चांगला वाटेल हे नक्कीच ठरवू शकता. काही अगदी साधे कॉमन आकार आहेत. कोणते ते जाणून घ्या.
3 / 8
एक प्रकरा असतो तो म्हणजे सरळ रेषेतील आयब्रो. ज्याला स्ट्रेट कट असे म्हटले जाते. जाड भुवया असतील तर त्या सरळ छान वाटतात.
4 / 8
एस शेप आयब्रो दिसायला छान वाटतात. मात्र सगळ्यांनाच सुट करत नाहीत. काही ठराविक महिलांनाच छान दिसतात.
5 / 8
अनेक भारतीय महिलांच्या भुवया या गोलाकार असतात. साधा गोल आकार आणि भरगच्च भुवया अगदी छान वाटतात.
6 / 8
आचकर्व हा एक कॉमन प्रकार आहे. कमानी प्रमाणे गोलाकार आणि मध्येच जरा वरती असलेला हा प्रकार अनेक जणींना आवडतो.
7 / 8
अनेक अभिनेत्रींचे आयब्रो अपवर्ड असतात. यामध्ये भुवयांचे टोक वरच्या दिशेने असते आणि ते टोकदार असते.
8 / 8
भुवया विरळ होत असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा. भुवयांना कोरफडीचा अर्क लावायचा. कोरफडीमुळे केस वाढतात आणि भुवया छान भरगच्च दिसतात.
टॅग्स : डोळ्यांची निगाब्यूटी टिप्समहिला