चेहऱ्यासाठी परफेक्ट आयब्रो कशी निवडाल? पाहा ६ प्रकार आणि आयब्रो जाड होण्यासाठी खास टिप
Updated:June 10, 2025 16:01 IST2025-06-10T15:56:09+5:302025-06-10T16:01:27+5:30
How to choose the perfect eyebrow shape for your face? See 6 types and special tips for thicker eyebrows : भुवया छान दिसाव्या यासाठी जाणून घ्या काय प्रकार असतात. आणि चेहऱ्यानुसार स्टाईल करा.

सगळ्याच महिला विविध ब्यूटी ट्रिटमेंट करत नाहीत. मात्र महिन्यातून एक फेरी ब्यूटी पार्लरला होतेच, ती आयब्रो थ्रेडींगसाठी. आयब्रो छान असतील तर चेहरा अगदी वेगळा दिसतो.
आयब्रोमध्येही प्रकार असतात. शक्यतो ब्यूटीशन आपल्याला विचारुन आकार देत नाही. त्या आपल्या आयब्रोचा आकार पाहून स्वत: ठरवतात की कोणता आकार द्यायचा. पण तुम्ही तुमच्या चेहर्याला कोणता आकार चांगला वाटेल हे नक्कीच ठरवू शकता. काही अगदी साधे कॉमन आकार आहेत. कोणते ते जाणून घ्या.
एक प्रकरा असतो तो म्हणजे सरळ रेषेतील आयब्रो. ज्याला स्ट्रेट कट असे म्हटले जाते. जाड भुवया असतील तर त्या सरळ छान वाटतात.
एस शेप आयब्रो दिसायला छान वाटतात. मात्र सगळ्यांनाच सुट करत नाहीत. काही ठराविक महिलांनाच छान दिसतात.
अनेक भारतीय महिलांच्या भुवया या गोलाकार असतात. साधा गोल आकार आणि भरगच्च भुवया अगदी छान वाटतात.
आचकर्व हा एक कॉमन प्रकार आहे. कमानी प्रमाणे गोलाकार आणि मध्येच जरा वरती असलेला हा प्रकार अनेक जणींना आवडतो.
अनेक अभिनेत्रींचे आयब्रो अपवर्ड असतात. यामध्ये भुवयांचे टोक वरच्या दिशेने असते आणि ते टोकदार असते.
भुवया विरळ होत असतील तर हा घरगुती उपाय नक्की करा. भुवयांना कोरफडीचा अर्क लावायचा. कोरफडीमुळे केस वाढतात आणि भुवया छान भरगच्च दिसतात.