Join us   

त्वचेनुसार फाउंडेशनची योग्य शेड कशी निवडायची? बघा ५ सोप्या टिप्स- करा परफेक्ट निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 3:35 PM

1 / 7
फाउंडेशन हा मेकअपचा बेस आहे. त्यामुळे मेकअप चांगला होण्यासाठी फाउंडेशनची निवड परफेक्ट करणं गरजेचं आहे
2 / 7
फाउंडेशनची निवड चुकली तर बऱ्याचदा त्वचेवर पॅचेस दिसतात. किंवा चेहऱ्यावर मेकअप थापल्यासारखा दिसतो. असं होऊ नये आणि तुम्हाला छान नॅचरल लूक मिळावा, यासाठी तुमच्या त्वचेनुसार बघा कशी करायची फाउंडेशनची अचूक निवड.
3 / 7
यातला पहिला नियम म्हणजे फाउंडेशन कधीही लाईटच्या उजेडात पाहू नका. स्वच्छ सुर्यप्रकाशात जा आणि फाउंडेशनची शेड पाहा.
4 / 7
फाउंडेशनचा शेड निवडायचा असेल तर आपण ते आपल्या हातावर लावतो आणि शेड चेक करतो. पण असं करू नये. फाउंडेशन नेहमी जॉ लाईनवर लावून तपासावे. तिथल्या त्वचेशी मॅच होणारं फाउंडेशन तुमच्या त्वचेसाठी परफेक्ट असतं.
5 / 7
तुमची त्वचा जर ऑईली असेल तर तुम्ही मॅट फाउंडेशन घ्या. जर त्वचा ड्राय असेल तर हायड्रेटिंग फाउंडेशनची निवड करावी.
6 / 7
तुमच्या स्किनटोनचे त्याच्या वरच्या नंबरचे आणि त्याच्या खालच्या शेडचे असे ३ फाउंडेशन नेहमी ट्रायलला घ्यावे. या ३ पैकी जो तुमच्या त्वचेत व्यवस्थित ॲडजस्ट होईल, त्या फाउंडेशनची निवड करावी.
7 / 7
तुमच्या स्किनचा अंडरटोन वार्म आहे, कुल आहे की न्युट्रल आहे, त्यानुसार फाउंडेशनची निवड करावी. त्यासाठी फाउंडेशनवर W, C, N यापैकी काय लिहिले आहे ते तपासावे, आणि तुमच्या अंडरटोननुसार फाउंडेशन घ्यावे.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी