चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

Updated:April 17, 2025 15:27 IST2025-04-17T15:12:45+5:302025-04-17T15:27:21+5:30

How To Apply Blush for Your Face Shape : How to apply blush according to face shape : How To Apply Blush For Your Face shape : How To Apply Blush To Suit Your Face Shape: काहीजणींना चेहऱ्यावर ब्लश लावण्याची योग्य पद्धतचं माहित नसते, त्यासाठी वापरुन पाहा या खास ट्रिक्स...

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

सध्या मेकअप करताना हलकासा ब्लश ( How to apply blush according to face shape) लावण्याचा ट्रेंड आहे. चेहऱ्यावर ब्लश लावल्याने चेहऱ्याला सुंदर गुलाबी लाली येते. परंतु हे ब्लश योग्य प्रमाणांत आणि योग्य पद्धतीने लावणे अतिशय गरजेचे असते.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

ब्लशचा वापर चेहऱ्यावर योग्य पद्धतीने केला नाही (How To Apply Blush To Suit Your Face Shape) तर आपण सुंदर दिसण्याऐवजी एखाद्या विदुषकासारखे दिसू शकतो.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

काहीजणींना चेहऱ्यावर ब्लश लावण्याची योग्य पद्धतचं माहित नसते. ब्लश फक्त गालांवर लावतात इतकेच माहित असल्याने अनेकजणी हे ब्लश गालांवर अगदी चोपडून लावतात. यामुळे तुमचा लूक बिघडू शकतो.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

यासाठी सेलिब्रिटींसारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवा असल्यास ब्लश लावण्याच्या योग्य पद्धती पाहुयात.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

जान्हवी कपूर नेहमी आपल्या चेहऱ्यावर ब्लश लावताना 'C' टेक्निक पद्धतीचा वापर करते. या पद्धतीत डोळ्यांच्या हलकेसे खाली गालांवरील चीकबोन्सवर इंग्रजी 'C' आकारात ब्लश लावून ते पसरवून घ्यावे. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा आकार उठून दिसण्यास मदत होते. आपण पाहू शकता की जान्हवीने ब्लश लावताना 'C' टेक्निक पद्धतीचा वापर केला असल्याने तिच्या गालांवर नैसर्गिक चमक दिसत आहे.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

दीपिका पदुकोण नेहमी आपल्या चेहऱ्यावर ब्लश लावताना 'O' टेक्निक पद्धतीचा वापर करते. या पद्धतीत दोन्ही गाल आणि नाकाच्या टोकावर थोडेसे ब्लश लावून घ्यावे त्यानंतर ब्रशच्या मदतीने ते व्यवस्थित गालांवर आणि नाकावर पसरवून घ्यावे. यामुळे तुमचे गाल आणि नाकाजवळील भाग हायलाईट होतो. आपण पाहू शकता की या 'O' टेक्निक पद्धतीमुळे दीपिकाच्या चेहऱ्यावर कसा गुलाबी ग्लो आला आहे.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

'V' टेक्निक पद्धतीचा वापर करून कतरीना कैफ आपल्या चेहऱ्यावर गुलाबी ग्लो आणण्यासाठी ब्लश लावते. या पद्धतीत दोन्ही गालांवर इंग्रजी अक्षर 'V' आडवे काढून मग ब्रशच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घ्यावे. अशा पद्धतीने गालांवर ब्लश लावल्याने चेहरा अधिक उंच आणि रेखीव दिसण्यास मदत होते. 'O' टेक्निक पद्धतीचा वापर केल्याने कतरीनाच्या चेहऱ्यावर हलकासा शोभून दिसेल असा गुलाबी ग्लो आला आहे.

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

आलिया भट नेहमी ब्लश लावण्यासाठी 'W' टेक्निक पद्धतीचा वापर करते. या पद्धतीत तुम्ही तुमच्या दोन्ही डोळ्यांखालील भागात इंग्रजी अक्षर 'W' या आकारात ब्लश लावून ब्रशच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घ्यावे. ब्लश लावताना एका डोळ्याच्या खालच्या भागापासून सुरुवात करून नाकावरून दुसऱ्या डोळ्याच्या खालपर्यंत ब्लश लावून घ्यावे. यामुळे तुम्हाला नॅचरल सन किस लूक मिळू शकतो. आपण पाहू शकता की आलियाच्या डोळ्यांखालील भागात ब्लश मुळे इंग्रजी अक्षर 'W' सारख्या आकारात गुलाबी ग्लो आला आहे.