घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

Updated:April 21, 2025 17:23 IST2025-04-21T16:53:34+5:302025-04-21T17:23:56+5:30

How do make bindis stay on your forehead during summer season : How to Stick a Bindi on Your Forehead during summer season : कपाळावर लावलेली टिकली घामामुळे सतत पडू नये म्हणून काही खास टिप्स फॉलो करा...

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

भारतीय महिलांमध्ये कपाळाला टिकली लावण्याची परंपरा आहे. कोणताही भारतीय लुक किंवा पोषाख हा कपाळावरील टिकली (How do make bindis stay on your forehead during summer season) शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे ही टिकली स्टाइल स्टेटमेंट म्हणून ओळखली जाते. आजकाल आपण आपल्या पेहेरावानुसार त्याला मॅच होणारी टिकली लावतो.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

आपल्यापैकी बहुतांश महिला आपल्या कपड्यांच्या रंगानुसार, प्रकारानुसार वेगवेगळ्या आकाराच्या, रंगांच्या, पॅटर्नच्या, लहान - मोठ्या टिकल्या लावणे पसंत करतात.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

ही टिकली कपाळावर चिकटून राहण्यासाठी त्याला ( How to Stick a Bindi on Your Forehead during summer season) वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि रसायन लावली जातात. या वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मुळेच ही टिकली कपाळावर चिकटून राहते.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

परंतु उन्हाळ्यात सतत त्वचेवर येणाऱ्या घामामुळे कपाळावरील टिकली सतत पडते. अशावेळी कपाळावर लावलेली टिकली पडू नये यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

१. कपाळावरील टिकली घामाने सतत पडत असेल तर, टिकली लावण्यापूर्वी कपाळ स्वच्छ आणि कोरडे करून घ्यावे. घाम आला असेल तर तो पुसून घ्या आणि मगच टिकली लावा. यामुळे टिकली पडणार नाही.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

२. टिकलीचा प्रकार निवडताना, घामामुळे सतत पडण्याची शक्यता कमी असलेल्या वॉटरप्रूफ टिकल्या निवडा.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

३. टिकली लावण्यापूर्वी, कपाळाला तेल किंवा क्रीम लावू नका, ज्यामुळे टिकली चिकटणार नाही. सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम लावल्यानंतर ते संपूर्णपणे वाळल्यानंतरच टिकली लावा, नाहीतर ओलाव्याने टिकली सतत पडते.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

४. कपाळावर टिकली लावण्यापूर्वी त्या भागात हलकीशी पावडर लावून घ्यावी, आणि मग टिकली लावावी. यामुळे टिकली घामाने पडत नाही.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

५. पातळ टिकलीऐवजी थोडी जाड टिकली वापरल्यास ती घामामुळे पडत नाही.

घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

६. जर टिकली सतत घामामुळे पडत असेल तर ती लावण्यापूर्वी टिकलीचे पाकीट ५ ते १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. ५ मिनिटानंतर टिकलीचे पाकीट फ्रिजमधून काढून टिकली लावावी, यामुळे घाम येऊनही टिकली कपाळावरुन पडत नाही.