महागडे तेल-शाम्पू लावूनही केस गळणं थांबत नाही? ‘हा’ घरगुती शाम्पू लावा, ३० दिवसात दिसेल फरक
Updated:October 30, 2025 15:42 IST2025-10-30T12:13:44+5:302025-10-30T15:42:56+5:30

केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, कमी वयात केस पांढरे होणे किंवा केसांची वाढ न होणे अशा केसांच्या बाबतीतल्या कोणत्याही समस्या असतील तर सगळ्यात आधी आपण शाम्पू बदलतो.
पण त्यामुळे फार काही फरक पडत नाही. उलट वेगवेगळे शाम्पू ट्राय केल्यामुळे केसांवर केमिकल्सचा एवढा मारा होतो की त्यामुळे केसांचं बऱ्याचदा नुकसानच होतं.
म्हणूनच आता विकत मिळणारे इतर सगळे शाम्पू सोडा आणि एक घरगुती शाम्पू काही दिवस नियमितपणे वापरून पाहा. हा शाम्पू वापरल्याने केसांच्या बऱ्याच तक्रारी कमी होऊ शकतात.
यासाठी एका भांड्यात दिड ग्लास गरम पाणी घ्या. त्यात आवळा आणि रिठा पावडर दोन्ही मिळून ६ चमचे घाला. काही वेळ हे पाणी झाकून ठेवा.
यानंतर दुसऱ्या एका भांड्यात ६ चमचे जवस घ्या. त्यात दिड ग्लास पाणी घालून ते गॅसवर गरम करायला ठेवा. पाणी उकळून थोडं चिकट झालं की गॅस बंद करा.
त्याचप्रमाणे अर्धी वाटी जास्वंदाच्या पाकळ्या घेऊन त्या ही थोड्या पाण्यात भिजत घाला.
तसेच ३ चमचे गुलाब पावडर घेऊन ती देखील काही वेळ गरम पाण्यात भिजत घाला.
आता आवळा, रिठा पावडरचे पाणी, जवसाचे पाणी, जास्वंदाच्या पाकळ्यांचे पाणी, गुलाब पावडरचे पाणी असं सगळं एका बरणीमध्ये एकत्र करा. त्यात ३ चमचे ॲलोव्हेरा जेल घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा. हा झाला तुमचा घरगुती शाम्पू तयार.
एकदा तयार केलेला हा शाम्पू महिनाभर चांगला राहातो. या शाम्पूने काही दिवस नियमितपणे केस धुवून पाहा. vaishu_umesh_katariya या इंस्टाग्राम पेजवर हा उपाय सुचवण्यात आला आहे.