संत्री खाऊन साल फेकू नका, त्वचेसाठी ‘असा’ करा उपयोग, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो
Updated:January 8, 2024 13:57 IST2024-01-07T09:15:11+5:302024-01-08T13:57:57+5:30

संत्री आरोग्यासाठी जशी उत्तम असते, तसेच संत्रीचे सालदेखील त्वचेसाठी खूप उत्तम टॉनिक ठरते
केसांसाठी जी शिकेकाई करण्यात येते, त्यात संत्रीची सालं आवर्जून टाकली जातात. आता त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी संत्रीची सालं कशी वापरायची ते पाहूया...
संत्रीची सालं वापरून त्वचेसाठी नाईट ऑईल कसं तयार करायचं याची माहिती lifewithrose0 या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
सगळ्यात आधी तर संत्रीची सालं काढून ती ४ ते ५ तासांसाठी वाळवून घ्या. त्यानंतर ती मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.
संत्रीच्या पावडरमध्ये आता ३ ते ४ लवंग आणि ती सगळी पावडर भिजेल एवढं ऑलिव्ह ऑईल टाका.
हे मिश्रण एका भांड्यात टाकून उकळून घ्या. थंड झालं की गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा.
रोज रात्री झोपण्यापुर्वी या तेलाचे ४ ते ५ थेंब घ्या आणि चेहऱ्याला मसाज करा...
काही दिवसांतच त्वचा अगदी तरुण दिसेल. डार्क सर्कल्स कमी होतील आणि त्वचेवर छान ग्लो येईल.