1 / 9केस गळणं, केस अकाली पांढरे होणं असा त्रास हल्ली बहुतांश लोकांना आहे. आपली बदललेली जीवनशैली, आहारपद्धती हे त्यामागचं एक कारण आहेच. 2 / 9केसांना धूळ, धूर, प्रदुषण, ऊन यांचा सामना तर रोज करावा लागतोच. शिवाय अनेक जण केसांवर नेहमीच वेगवेगळे कॉस्मेटिक्स लावतात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या केमिकल्सचा परिणामही केसांवर होतोच.3 / 9त्यामुळे तुम्हीही केसांच्या समस्यांमुळे वैतागला असाल, तर इतर सगळे प्रयोग सोडा आणि हा घरगुती शाम्पू तयार करून त्याने केस धुवून पाहा. केस गळणं लगेचच कमी होईल. हा शाम्पू कसा तयार करायचा याविषयीचा व्हिडिओ jyotiagarwal7488 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.4 / 9हा उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून मेथी दाणे आणि १० ते १२ रिठे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.5 / 9यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एका भांड्यात राईस वॉटर घ्या. राईस वॉटर नसेल तर साधं पाणी घेतलं तरी चालेल.6 / 9या पाण्यात जास्वंदाचं एक फूल आणि काही पानं तुकडे करून टाका.7 / 9त्याच पाण्यात ताज्या कोरफडीचा गरदेखील टाका.8 / 9तसेच १ टेबलस्पून जवस टाका. या पाण्यातच रात्रभर पाण्यात भिजवलेले रिठे आणि मेथी दाणे टाका आणि हे मिश्रण चांगलं उकळून घ्या.9 / 9यानंतर हे मिश्रण थंड झालं की गाळून घ्या. ते एखादी जेली असते त्याप्रमाणे घट्ट होईल. त्यानेही तुम्ही केस धुवू शकता. किंवा ते मिक्सरमधून बारीक फिरवून त्याने केस धुवा. हा नॅचरल हाेममेड शाम्पू तुम्ही फ्रिजमध्ये ठेवला तर २ आठवडे तो चांगला राहील.