Join us

ओठांवर खूप भेगा दिसतात- कोरडे पडून काळवंडले? घ्या उपाय- ओठ होतील मऊ, गुलाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 12:06 IST

1 / 6
आपले ओठ मऊ, गुलाबी असावेत असं सगळ्यांनाच वाटतं. पण बऱ्याच जणींच्या बाबतीत तसं होत नाही, म्हणूनच मग ओठांचा काळेपणा लपविण्यासाठी त्यावर लिपस्टिकचा थर द्यावा लागतो.
2 / 6
पण अशा वेगवेगळ्या रंगाच्या लिपस्टिक लावण्यापेक्षा जर ओठ नैसर्गिकपणे गुलाबी झाले तर किती छान.. म्हणूनच तर हा घ्या एक खास उपाय..
3 / 6
जर तुमचे ओठ खूप काळवंडून गेले असतील किंवा कोरडे पडल्याने नेहमीच भेगाळून त्यातून रक्त येत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो..
4 / 6
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बीटरुटचा रस घ्या..
5 / 6
त्यामध्ये अर्धा चमचा पिठीसाखर घाला. पिठीसाखरेमुळे ओठांवरची डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि त्यावर नैसर्गिकपणे एक छान चमक येण्यास मदत होईल.
6 / 6
आता या मिश्रणातच थोडेसे व्हॅसलिन घाला. तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि ते तुमच्या ओठांवर चोळा. १- २ मिनिटांनी ओठ स्वच्छ धुवून टाका. हा उपाय काही दिवस रोज करून पाहा. ओठ छान मऊ, मुलायम, गुलाबी होती.
टॅग्स : ब्यूटी टिप्सओठांची काळजीहोम रेमेडी