तेल- शाम्पू बदलून थकलात तरी केस गळणं थांबेना? करा 'हा' उपाय- महिनाभरात केस वाढतील
Updated:May 3, 2025 14:40 IST2025-05-03T14:35:01+5:302025-05-03T14:40:07+5:30

हल्ली बहुतांश लोकांची एकच तक्रार आहे की केस खूप जास्त गळत आहेत. शिवाय केसांना अजिबातच वाढ नाही. काही केल्या केस वाढत नाहीत.(home remedies for fast hair growth)
यासाठी ते लोक अनेक वेगवेगळे शाम्पू, तेल वापरून पाहतात. पण तरीही केसांवर म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. केस गळणं काही बंद होत नाही.(home hacks to control hair loss or hair fall)
म्हणूनच आता इतर सगळे उपाय सोडा आणि हा एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय कसा करावा, याविषयीची माहिती kailashayogastudiorishikesh या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(how to control hair loss?)
हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ कप पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ चमचा चहा पावडर घाला.
तसेच १ चमचा मेथी दाणे घालून हे पाणी ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर त्यात तुमचा नेहमीचा शाम्पू घाला.
आता या पाण्याने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा काही दिवस नियमितपणे करा. काही दिवसांतच केसांमध्ये खूप छान वाढ दिसून येईल. तसेच केस गळणंही कमी होईल.