Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडी सुरू होताच डोक्यातला कोंडा वाढून केस गळणं सुरू? करून पहा ५ गुणकारी घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 09:20 IST

1 / 8
१. थंडी सुरू होताच त्वचेचा आणि स्काल्पचा म्हणजेच डोक्याच्या त्वचेचा ड्रायनेस वाढतो. आणि त्यामुळे मग केसांतला कोंडा वाढू लागतो. त्यामुळे काही जण अक्षरश: वैतागून जातात. कारण काहीही केलं तरी कोंडा काही कमी होतच नाही.
2 / 8
२. कधी कधी डोक्यातल्या कोंड्याचे प्रमाण एवढे वाढते की या दिवसांत मग डार्क रंगाचे कपडे घालण्याचीही भीती वाटते. कारण खांद्यावर लगेचच कोंडा पडलेला दिसून येतो. शिवाय वेगवेगळी हेअरस्टाईल करणेही अगदी नकोसे होते. कारण भांग बदलला की लगेच डोक्यातला कोंडा उठून दिसतो.
3 / 8
३. डोक्यातला कोंडा वाढला की मग केस गळणंही वाढतं आणि डोक्याला दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच कोंडा लवकरात लवकर आटोक्यात आणण्याची गरज असते. त्यासाठीच हे काही घरगुती पण अतिशय गुणकारी ठरणारे उपाय करून बघा.
4 / 8
४. लिंबाचा रस आणि गरम केलेलं खोबरेल तेल हे दोन्ही समप्रमाणात घ्या आणि त्याने डोक्याला मसाज करा. साधारण एका तासाने केस धुवून टाका.
5 / 8
५. डोक्यातला कोंडा म्हणजे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असतं. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी टी ट्री ऑईल आणि बदाम तेल उपयुक्त ठरतं. यासाठी ५० मिली बदाम तेलामध्ये ३ ते ४ थेंब टी ट्री ऑईल टाका आणि त्याने डोक्याला मसाज करा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका.
6 / 8
६. कोरफड आणि कडुलिंबाची पानं या दोन्हींमध्येही मोठ्या प्रमाणात ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. यासाठी कोरफडीचा गर ३ ते ४ चमचे आणि कडुलिंबाची १५ ते २० पाने एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्या. हा लेप डोक्याच्या त्वचेला लावा आणि १ तासाने केस धुवून टाका.
7 / 8
७. २ टेबलस्पून मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून त्याची पेस्ट करा. त्यात अर्धा टीस्पून व्हिनेगर टाका. हा लेप डोक्याच्या त्वचेला लावा आणि अर्धा- एक तासाने केस धुवून टाका.
8 / 8
८. अर्धी केळी कुस्करून घ्या. त्यात अर्धे लिंबू पिळा आणि एक टीस्पून मध टाका. हे मिश्रण एकत्र करून ते केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या- एक तासाने केस धुवून घ्या.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी