Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळा सुरू होताच केस गळणं वाढलं? 'हा' सोपा उपाय महिनाभर करा, केस गळणं बंद होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2025 12:17 IST

1 / 8
हिवाळा सुरू झाला की डोक्यात कोंडा होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. डोक्याला खूप खाजही येते.
2 / 8
कोंडा वाढला की आपोआपच त्याचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळण्याचं प्रमाणही खूप वाढतं.
3 / 8
केस गळणं कमी करायचं असेल तर या दिवसांत बाजारात मिळणाऱ्या आवळ्यांचा पुरेपूर वापर केसांसाठी करायला हवा.
4 / 8
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा आवळा पावडर घ्या. आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म केसांच्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात.
5 / 8
आता त्यामध्येच १ चमचा मेथी दाण्यांची पावडर घाला. केसांची मुळं पक्की करून केस गळणं कमी करण्यासाठी मेथी दाणे खूप उपयुक्त ठरतात.
6 / 8
आता यामध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि ४ ते ५ चमचे कांद्याचा रस घाला. केसांवर चमक येऊन ते मऊ, सिल्की होण्यासाठी ॲलोव्हेरा जेल उपयुक्त ठरते, तर कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ होते.
7 / 8
आता हा लेप केसांच्या मुळाशी तसेच केसांवर व्यवस्थित लावा. त्यानंतर पाऊण तासाने केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा.
8 / 8
महिनाभर नियमितपणे हा उपाय केल्यास केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीकेसांची काळजीहोम रेमेडी