1 / 10१. साडी हा नेहमीच महिलांचा आवडीचा विषय... साडी नेसण्यासाठी जेवढी तयारी करावी लागते, तेवढी कोणत्याच दुसऱ्या कपड्यासाठी करावी लागत नाही. ज्वेलरीसोबतच साडीवरची हेअरस्टाईल ठरवणं, हे तर सगळ्यात मोठं काम...2 / 10२. साडी नेसल्यावर सगळ्याच जणी छान दिसतात, पण तरीही स्पेशल लूक हवा असेल, तर आपल्या हेअरस्टाईलकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, हे नक्की. माेकळे केस हा एक पर्याय होऊच शकतो, पण त्यापेक्षा जर अशी काही खास हेअरस्टाईल करता आली, तर आपला लूक अधिक खास दिसू शकतो.3 / 10३. केस छोटे असतील, तर कंगणाचा हा लूक एकदम परफेक्ट आहे.. साडी नेसली की अशा स्टाईलने केस सेट करून घ्या, छान दिसाल..4 / 10४. एखाद्या पार्टीसाठी तयार होताना जॅकलिनसारखा हा लूक नक्कीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लूक देईल. डिझायनर साडीवर तर ही हेअरस्टाईल जाम सूट होईल.5 / 10 ५. साडीवर पोनीच घालणार असाल तर अशा पद्धतीनेही घालता येईल. जर ब्लाऊजचा मागचा गळा खास असेल तर त्यावेळी अशी हेअरस्टाईल करून केस पुढे घ्या.. मागून- पुढून दिसाल खास.6 / 10 ६. पोनी घालण्याची ही आणखी एक पद्धत. मधून भांग पडून एकदम मानेवर बांधलेला बो. अशी हेअरस्टाईल एखाद्या ट्रॅडिशनल साडीवर अधिक छान दिसू शकेल. 7 / 10. साडी नेसल्यावर वेणी घालायचा विचार असेल तर अशा पद्धतीने मेसी ब्रेड स्टाईल नक्कीच करता येईल.. साडी आणि वेणी हे कॉम्बिनेशन नेहमीच भाव खाऊन जाणारं आहे...8 / 10८. लग्न, घरातली एखादी पूजा किंवा एखाद्या पारंपरिक सोहळा, सणवार यासाठी साडी नेसणार असाल तर श्रद्धा कपूरचा हा लूक त्यासाठी परफेक्ट आहे. 9 / 10९. बन प्रकारातली ही आणखी एक हेअरस्टाईल. एखादं सेलिब्रेशन किंवा पार्टी अशाप्रसंगी साडी नेसणार असाल तर सोनाली कुलकर्णीसारखा हा बन तुम्हाला अधिक आकर्षक लूक देईल. 10 / 10१०. तुमची साडी डिझायनर असो किंवा काठपदर, एखादा पारंपरिक कार्यक्रम असो किंवा मग पार्टी किंवा रिसेप्शन ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच छान दिसणार.