1 / 7कसे इतके गळू लागले आहेत की टक्कलच पडेल असे आपल्या प्रत्येकालाच वाटते. अशावेळी आपण केसांना अनेक महागडे उत्पादने लावतो. ज्याच्यामुळे केस आणखी गळू लागतात. (hair fall solution)2 / 7आयुर्वेदात केस गळती,कोंडा आणि केसांच्या वाढीसाठी कापूर संजीवनी मानली जाते. नारळाच्या तेलात किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास केस मजबूत होतात. (camphor oil for hair)3 / 7केसगळती आणि केसात कोंडा असेल तर कापूरचा वापर कसा करायचा पाहूया. (natural hair care) 4 / 7आपले केस गळत असतील किंवा केसात कोंडा झाला असेल तर कापूर हा नैसर्गिक प्रभावी उपाय ठरु शकतो. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आपल्या टाळूला निरोगी बनवतात. 5 / 7नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती थांबते. 6 / 7केसांना तेल लावण्यासाठी २ चमचे नारळाचे तेल आणि १ छोटा कापूर घाला. नंतर हलके गरम करुन थंड झाल्यावर केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास केसगळती थांबण्यास मदत होईल. 7 / 7आपले केस कोरडे असतील तर ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून लावा. हे टाळूला मॉइश्चरायझ करते ज्यामुळे केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून रोखले जाते.