दाट, लांब केसांसाठी मृणाल ठाकूर करते 'हा' उपाय- म्हणते माझ्या केसांना एक्सटेंशनची गरजच नाही..
Updated:July 25, 2025 14:21 IST2025-07-25T14:09:03+5:302025-07-25T14:21:57+5:30

बऱ्याच अभिनेत्रींच्या बाबतीत असं असतं की त्या त्यांच्या केसांना नेहमीच एक्सटेंशन किंवा गंगावन लावत असतात. कारण त्यांचेही केसही पातळ असतात. अगदी केस मोकळे सोडलेले असतील तरी त्यांच्या केसांना एक्सटेंशन असते.
पण अभिनेत्री मृणाल ठाकूर मात्र म्हणते की ती तिचे केस खूप जाड, दाट आहेत. त्यामुळे तिला एक्सटेंशन लावण्याची गरज फारशी पडत नाही.
दाट, लांब केसांसाठी ती नेमकं काय करते हा उपायही तिने तिच्या एका मुलाखतीत शेअर केला आहे. सध्या तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृणाल ठाकून म्हणते की लांब, दाट केसांसाठी ती बदामाचं तेल लावते. सगळे प्रोडक्ट्स एकीकडे आणि बदामाचं तेल एकीकडे असं तिचं मत आहे.
त्वचा आणि केस या दोघांसाठीही बदामाचं तेल अतिशय फायदेशीर असून त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया.
एका वाटीमध्ये २ चमचे बदाम तेल घ्या. त्यामध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. आता हा लेप केसांच्या मुळाशी लावा.
यानंतर एका तासाने केस धुवून टाका.केस गळणं कमी होईल आणि त्यांची वाढही चांगली होईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा.
रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हातावर ४ ते ५ थेंब बदाम तेल घ्या. या तेलाने चेहऱ्याला मालिश करा. तुम्हाला कोणतंही दुसरं नाईट क्रिम वापरण्याची गरज नाही. चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल. वय वाढलं तरी त्वचा तरुण राहील.