Join us   

Diwali Special Hairstyle for Saree : दिवाळीला साडीवर हेअरस्टाईल कोणती शोभेल? सौंदर्य खुलवतील 'या' एकापेक्षा एक सोप्या हेअरस्टाईल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 4:54 PM

1 / 10
कोणताही सण म्हटलं की साडी नेसण्याचा उत्साह सगळ्याच महिलांना येतो. दिवाळीसाठी (Diwali 2021) नवीन साडी नेसल्यानंतर नेहमीपेक्षा वेगळा हटके लूक करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं.
2 / 10
. मेकअपपासून (Makeup) हेअरस्टाईल ( HairStyle) कशी असेल याचं प्लॅनिंग आधीच बायका करून ठेवतात. तर काहीजणी नेहमी सारखाच एखादा क्लिप लावून केस गुंडाळतात.
3 / 10
आम्ही तुम्हाला दिवाळीला साडीचा लूक खुलवतील अशा काही हेअरस्टाईल्स दाखवणार आहोत. साडीवरचा किंवा पारंपारिक ड्रेसवरचा तुमचा लूक खुलवण्यासाठी या हेअरस्टाईल्स नक्की फायदेशीर ठरतील.
4 / 10
केसांना लावण्यासाठी वेगवेगळे ब्रॉच बाजारात तुम्हाला मिळतील. सिंपल बन बांधूनही तुम्ही हे ब्रॉच केसांभोवती गुंडाळू शकता.
5 / 10
केसांना मशीनचा वापर करून स्टेटनिंग किंवा करली लूक देऊ शकता. कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांवर सिरम अप्लाय करा जेणेकरून हेअरस्टाईल जास्त वेळ चांगली राहिल आणि केस चमकदार दिसतील.
6 / 10
तुम्हाला हेअरस्टाईल करण्यासाठी फारसा वेळ नसेल तर फक्त दोन ते तीन क्लिप्स लावून तुम्ही केस मोकळे ठेवू शकता.
7 / 10
घरातील इतर व्यक्तींची मदत घेऊन तुम्ही केसांवर वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स ट्राय करू शकता.
8 / 10
फुलांचा ब्रॉच किंवा ताजं फुल केसांना लावणं हासुद्धा एक बेस्ट पर्याय असू शकेल.
9 / 10
केसांचे दोन भाग करून किंवा समोरून पफ काढून तुम्ही मागे बन बांधू शकता.
10 / 10
जर तुम्ही सिंपल बन किंवा स्टायलिश बन बांधणार असाल तर समोरचे केस कर्ल्स करायला विसरू नका.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीदिवाळी 2021फॅशन