Diwali Photo Shoot Ideas: सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी 'असे' काढा फोटो, मिळतील चिक्कार लाईक्स..
Updated:October 17, 2025 14:45 IST2025-10-17T14:38:38+5:302025-10-17T14:45:51+5:30

दिवाळीमध्ये आपण छान तयार झालेलो असतो. आपलं घरही सुंदर सजलेलं असतं. अशावेळी स्वत:चे छान छान फोटो काढून घेण्याचा मोह होतोच. पण नेमकं कसे फोटो काढावे, पोझेस कशा घ्याव्या हे समजतच नाही.
त्यासाठीच बघा या काही खास फोटोशूट आयडिया.. या पद्धतीने फोटो काढाल तर तुम्ही सुद्धा एकदम कमाल दिसाल..
दिवाळीला आपण घरासमोर छानशी रांगोळी काढतोच. त्या रांगोळीसमोर बसून असा फोटोही काढू शकता.
दिव्याचं ताट हातात घेऊन आणि दिवे अवतीभोवती ठेवून काढलेला हा एक सुंदर फोटो बघा.
फुलबाजी हातात घेऊन अशा पद्धतीने कॅमेऱ्याकडे न बघता फोटो घेतला तर तो नक्कीच छान येईल.
घराभोवती किंवा घरात एखाद्या कॉर्नरला जर तुम्ही काही सजावट केली असेल तर तिथेही असा फोटो काढता येईल.
या दिवसांत अनेकजण मोठमोठ्या समया लावतात. त्याठिकाणी किंवा लक्ष्मीपुजनाच्या पुजेच्या ठिकाणी तुम्ही असा फोटो काढू शकता.
ही आणखी एक फोटो शूट आयडिया पाहा.. चेहऱ्यावर आनंद असला की किती कमाल फोटो येऊ शकतात..