बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

Updated:September 2, 2025 17:17 IST2025-09-02T17:04:06+5:302025-09-02T17:17:21+5:30

if you want beautiful & soft feet follow these 6 easy tips you will also get rid of cracked heels : tips to get rid of cracked heels : easy home remedies for cracked heels : how to heal cracked heels naturally : best tips for soft heels : foot care tips at home : cracked heel treatment at home : natural ways to cure cracked heels : daily habits to prevent cracked heels : आजपासूनच फ़ॉलो करा अशा ६ सोप्या सवयी ज्या पायांना भेगा पडू देत नाहीत...

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांच्या टाचांना भेगा पडण्याची समस्या आपल्यापैकी अनेकींना (natural ways to cure cracked heels) सतावते. काहीजणींच्या पायांच्या टाचांना तर कायम भेगा पडलेल्या असतात. बहुतेकवेळा पायांची काळजी घेऊन देखील या टाचांच्या भेगा काही केल्या जात नाहीत. भेगा पडलेल्या टाचांमुळे पायांचे सौंदर्य तर बिघडतेच, पण त्यातून होणाऱ्या वेदनांमुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होते.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांच्या टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी आपण अनेक (best tips for soft heels) वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स, लोशन लावतो. परंतु या उपायांचा परिणाम हा तात्पुरता असतो. यासाठीच, या उपायांसोबतच काही साध्यासोप्या सवयी फॉलो केल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांच्या टाचांना भेगा पडणे ही एक सर्वसाधारण (foot care tips at home) समस्या आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या अधिक वेदनादायक होऊ शकतात. योग्य काळजी आणि काही सोप्या सवयी स्वताला लावल्यास या भेगा सहज टाळता येतात आणि टाचा मऊ, स्वच्छ व सुंदर दिसतात. पाहूयात अशा ६ सोप्या सवयी ज्या पायांना भेगा पडू देत नाहीत.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांची दररोज योग्य प्रकारे स्वच्छता करणे महत्त्वाचे असते. दिवसभर धूळ, माती आणि घाम पायांमध्ये जमा होतो, ज्यामुळे दुर्गंधी आणि इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. यासाठी, कोमट पाण्यात पाय थोडावेळ बुडवून ठेवा आणि हलक्या हाताने ब्रश किंवा प्युमिक स्टोनने स्वच्छ करा. यामुळे पायांवरील घाण आणि मृत त्वचा निघून जाते पायांची त्वचा स्वच्छ व सुंदर होते.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

जसे चेहऱ्याला मॉइश्चराईझ करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे पायांनाही आर्द्रतेची गरज असते. दररोज पायांवर फूट क्रीम किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचा मऊ राहते आणि भेगाळलेल्या टाचां लगेच बऱ्या होतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी फूट क्रीम लावून सुती मोजे घाला.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

भेगाळलेल्या टाचा केवळ दिसायलाच वाईट नाहीत तर वेदना आणि संसर्गाचे कारण देखील बनू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पायांमध्ये मॉइश्चरायझरची कमतरता. यावर उपाय म्हणून नियमितपणे मॉइश्चरायझरचा वापर करा. जर टाचा जास्त भेगाळल्या असतील तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून पाय भिजवा आणि नंतर क्रीम लावा. हा उपाय भेगाळलेल्या टाचा लवकर भरण्यास मदत करतो.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी योग्य प्रकारचे चप्पल किंवा शूज घालणे खूप महत्त्वाचे आहे. घट्ट चपला - बूट यामुळे पायांमध्ये घाम आणि आग, जळजळ होते. यामुळे 'अ‍ॅथलीट फूट' सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, नेहमी आरामदायक आणि हवा खेळती राहणाऱ्या चपल - बुटांची निवड करा. यामुळे पायांना हवा मिळते आणि त्वचा निरोगी राहते.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांच्या टाचांच्या त्वचेला देखील स्क्रबिंगची गरज असते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पायांना स्क्रब करा. तुम्ही घरीच साखर आणि मध यांचे एकत्रित मिश्रण बनवून पायांवर घासून स्क्रबिंग करु शकता. यामुळे पायांवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचेची चमक परत येते. वेळोवेळी पेडिक्युअर केल्याने देखील पाय स्वच्छ आणि सुंदर दिसतात.

बारमाही पायांच्या टाचांना भेगा पडतात? ६ सवयी बदला - भेगा गायब टाचा सुंदर....

पायांचे आरोग्य थेट तुमच्या आहाराशी जोडलेले असते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरासोबतच पायांची त्वचा देखील हायड्रेटेड राहते. व्हिटॅमिन-ई (vitamin-E) आणि ओमेगा-३ (omega-3) असलेले पदार्थ टाचांची त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतात, म्हणून आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा.