Join us

एक्सपर्ट सांगतात शरीरातलं कॉपर कमी झाल्यामुळे कमी वयात केस पांढरे होतात! म्हणूनच 'हे' पदार्थ खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 09:20 IST

1 / 8
कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सध्या खूप वाढली आहे. म्हणूनच आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला बहुसंख्य तरुणांच्या उपयोगी येऊ शकतो.
2 / 8
आहारतज्ज्ञांनी याविषयीची पोस्ट nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की कमी वयात केस पांढरे होण्याचं एक कारण म्हणजे शरीरात कॉपरची कमतरता असणं. ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असायला हवे.
3 / 8
ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. त्यापैकी पहिला पदार्थ आहे हरबरे. हरबऱ्यांमधून प्रोटीन्सही मिळतात आणि केसांनाही फायदा होतो.
4 / 8
दुसरा पदार्थ आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमधून मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी होतो.
5 / 8
तिसरा पदार्थ आहे तीळ. तीळ प्रत्येकाने खायलाच हवेत. कारण कॉपरप्रमाणेच त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. शिवाय तीळामध्ये व्हिटॅमिन ई असते. ते केसांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरते.
6 / 8
सुर्यफुलाच्या बिया नियमितपणे खाव्या. त्यातूनही कॉपर चांगल्या प्रमाणात मिळते, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
7 / 8
मशरूम हा देखील कॉपरचा एक चांगला स्त्राेत आहे. त्यामुळे केस पांढरे होत असतील तर आहारातले काॅपरचे प्रमाण वाढवा.
8 / 8
हिरव्या पालेभाज्यांमधूनही चांगल्या प्रमाणात कॉपर मिळते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीअन्न