रेखा.. मूर्तीमंत सौंदर्य! आयुष्यभर जपल्या ४ सवयी, म्हणून रेखा आजही दिसते कमालीची सुंदर!
Updated:June 27, 2025 15:25 IST2025-06-27T15:20:58+5:302025-06-27T15:25:39+5:30
secrets behind Rekha’s glowing skin : daily habits of Rekha: Rekha fitness and lifestyle: वयाच्या सत्तरीतही त्वचेची काळजी कशी घ्यायची पाहूया.

वयाच्या ७० व्या वर्षी देखील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. तिच्या देखण्या रुपाने आणि उत्तम फिटनेसने बॉलिवूड जगात आजही ती लोकप्रिय आहे. तिच्या अभिनायासोबत तिने सौंदर्याने देखील अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे. (secrets behind Rekha’s glowing skin)
वय वाढले तरी तिच्या सौंदर्याची जादू आजही अनेकांच्या मनाचे ठाव घेते. फक्त फॅशन नाही तर सौंदर्य आणि फिटनेसची चर्चा तितकीच रंगते. (daily habits of Rekha)
सध्या उमराव जान या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान पुन्हा एकदा रेखाच्या सौंदर्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. ७० व्या वर्षी देखील रेखाने तिचे सौंदर्य कसं जपलं, नेमक्या कोणत्या गोष्टी ती त्वचेवर आजही लावते. ज्यामुळे तिचा चेहरा आजही तितकाच सुंदर आणि चमकदार दिसतो. अनेक मुलाखतीत तिने तिच्या त्वचेच सिक्रेट सांगितलं आहे. वयाच्या सत्तरीतही त्वचेची काळजी कशी घ्यायची पाहूया.
बेसन त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर आहे. स्वयंपाकघरातील हा घटक आपल्या जवळजवळ सर्व त्वचेच्या समस्यांशी लढण्यास मदत करतो. टॅनिंग दूर करण्यास मदत करते. तसेच बेसनामुळे आपली त्वचा स्वच्छ होते. त्वचेला स्वच्छ करण्यासाठी आणि टोनिंग करण्यासाठी बेसन फायदेशीर आहे.
रेखासारखे लांब आणि जाड केस आपल्या सर्वांना हवे असतील तर ती केसांना घरगुती हेअर पॅक लावते. यामध्ये ती दही, मध आणि अंड्याचा पांढरा भाग तयार करुन केसांना लावते. यामुळे केस मऊ होतात.
रेखा सुंदर दिसण्यासाठी दिवसातून सुमारे १० ते १२ ग्लास पाणी पिते. यामुळे तिची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे तिची त्वचा चमकदार होते.
रेखा म्हणते निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योगा करायला हवा. त्यासाठी ती तिच्या फिटनेस रुटीनमध्ये नियमितपणे ध्यान आणि योगाचा समावेश करते. तसेच जंक फूड, जास्त तेल आणि मसाल्याचे पदार्थ खाणे टाळते.